agriculture news in Marathi, this year Agriculture growth rate will decline, Maharashtra | Agrowon

यंदा कृषीचा विकासदर घसरणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जानेवारी 2018

शेती व संलग्न क्षेत्राचा विकास दर यंदा २.१ टक्के राहणार आहे. २०१६-१७ मध्ये त्या आधीच्या दोन वर्षातील दुष्काळामुळे विकास दर उच्चांकी पातळीवर होता. मात्र यंदा ती स्थिती राहणार नाही. 
- टी. सी. ए. अनंत, मुख्य, संख्याशास्त्रज्ञ

नवी दिल्ली : भाजपचे सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर चार वर्षात पहिल्यांदाच एकूण देशांतर्गत उत्पन्नामध्ये (जीडीपी) घट होणार आहे. केंद्राने लागू केलेल्या जीएसटीचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर झाला असून या क्षेत्राच्या वाढीला खीळ बसली. तसेच मागील वर्षी ४.९ टक्के असलेला कृषी संलग्न क्षेत्राचा विकास दर यंदा २.९ टक्केपर्यंत कमी होणार आहे. या दोन्ही क्षेत्रातील घटीमुळे २०१७-१८ या वर्षातील जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय संख्याशास्त्र व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केला.

२०१६-१७ मध्ये हा जीडीपीचा दर ७.१ टक्के होता. म्हणजेच यंदा त्यात अर्ध्या टक्‍क्‍याहून अधिक घट नोंदली जाणे अपेक्षित आहे. कृषि व संलग्नक्षेत्रांच्या वाढीचा दर २.१ टक्के राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दरही कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात देखील घसरण होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

संख्याशास्त्र मंत्रालयातर्फे २०१७-१८ मधील राष्ट्रीय प्राप्ती विषयक प्राथमिक अंदाजाची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये हे तपशील देण्यात आले आहेत. ‘जीडीपी’मधील प्रत्यक्ष वाढीची आकडेवारी देताना संस्थेने ती वाढ १२९.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचेल, असे म्हटले आहे. २०१६-१७ मधील ‘जीडीपी’मधील प्रत्यक्ष वाढ १२१.९० लाख कोटी रुपयांची असल्याचा हंगामी अंदाज होता.

एकूण मूल्यवर्धन किंवा ‘ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड’(जीव्हीए) म्हणजेच औद्योगिक क्षेत्राद्वारे उत्पन्न झालेल्या वस्तू व सेवा यांच्या मापनाच्या पध्दतीनुसार यामध्ये देखील १११.८५ लाख कोटी रुपयांवरुन ११८.७१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे. 

धान्योत्पादन घटणार 
कृषी, वनसंपदा, मत्स्यव्यवसाय यामध्ये २.१ टक्के वाढीची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राने ४.९ टक्के वाढ नोंदवली होती. देशातील धान्योत्पादनातही घट होण्याची शक्‍यता आहे. २०१७-१८ मध्ये धान्योत्पादन १३.४६ कोटी टन अपेक्षित आहे. २०१६-१७ मध्ये ते १३.८५ कोटी टन होते.

महागाईचा चढता आलेख 
घाऊक किंमत निर्देशांकात पहिल्या सहा महिन्यांत २.६ टक्के वाढ झाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात या सहा महिन्यांच्या कालावधीत ३ टक्के वाढ झाली. जीवनावश्‍यक किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये झालेल्या महागाईचे प्रतिबिंब या टक्केवारीत आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...