येलदरी, सिद्धेश्वर धरणामध्ये अद्याप मृतपाणीसाठा

येलदरी, सिद्धेश्वर धरणामध्ये अद्याप मृतपाणीसाठा
येलदरी, सिद्धेश्वर धरणामध्ये अद्याप मृतपाणीसाठा

परभणीः पाणलोट क्षेत्रात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस न झाल्यामुळे पूर्णा नदीवरील परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन मोठ्या धरणांमध्ये रविवारी (ता.५) केवळ मृत पाणीसाठा उपलब्ध आहे.

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर येथील धरणामध्ये रविवारी (ता. ५) इसापूर धरणामध्ये ३०९.२७ दलघमी म्हणजेच ३२.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे.

पैठण येथील जायकवाडी, नांदेड येथील विष्णुपुरी, माजलगाव, निम्न दुधना पाणीसाठ्यात घट झाली आहे. करपरा (जि. परभणी) निम्न मानार (जि. नांदेड) प्रकल्पातील पाणसाठा स्थिर आहे. मासोळी मध्यम प्रकल्पात मृत पाणीसाठा नाही. येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक झाल्याने एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली, परंतु अद्याप जिवंत पाणीसाठा निर्माण झाला नाही.

रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजता जायकवाडी प्रकल्पांमध्ये ६८६.३३६ दलघमी (३१.६२ टक्के), माजलगाव धरणामध्ये ३ दलघमी (०.९६ टक्के), निम्न दुधना धरणामध्ये (१३.९३ टक्के), विष्णुपुरी प्रकल्पांमध्ये ७४.५७ दलघमी (९२.३० टक्के) निम्न मनार प्रकल्पांत १४.३४ दलघमी (१०.३८ टक्के) पाणीसाठा होता. करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पांमध्ये गत आठवड्याप्रमाणेच ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परंतु मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पामध्ये अद्याप मृत पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये १८.४९ टक्के, मुद्गल बंधाऱ्यामध्ये १०.३३ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ५१.४९ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये ९.४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. झरी तलावांमध्ये ५२ टक्के, पिंपळदरी तलावांत ४.४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ४ प्रकल्पांमध्ये सरासरी ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com