भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हा

भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हा
भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हा

पुणे : सध्या लोकशाही धोक्यात आणणा-या भाजपची घमेंड पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे उतरली आहे. भाजपमध्ये फक्त दोघांची मनमानी चालत असून, बाकीचे सर्व घाबरून गप्प बसले आहेत. मुर्दांडांचा पक्ष बनलेल्या भाजपमध्ये हे दोघे भविष्यातदेखील कोणालाही वर येऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी (ता.१२) 'सध्याची राजकीय स्थिती आणि माध्यमे' याविषयावर श्री. सिन्हा यांनी भाजपवर चौफेर टीका केली. भाजपाला पर्याय म्हणून पूर्णतः कॉंग्रेस पक्षाचेही समर्थन मी करणार नाही. कारण याच कॉंग्रेसचा इतिहास देशात आणीबाणी लादण्याचाही आहे. त्यामुळे भाजपची गाठ आता कोणत्याही पक्षाशी नव्हे, तर जनतेशी आहे. जनताच त्यांना धडा शिकवेल, तसेच पर्यायदेखील देईल, अशा आशावाद श्री. सिन्हा यांनी व्यक्त केला.  मी पक्ष सोडला आहे. आता देशभर फिरून माझी मते मांडण्याची मी ठरविले आहे. आपण ब्रिटिश संसदीय प्रणाली स्वीकारली आहे. तेथे सर्वांमध्ये समानता असते. पंतप्रधान हे सर्वांपैकी एक असतात. भारतात मात्र सध्या पंतप्रधान ‘बॉस’ बनले आहेत. देशाच्या कार्यकारी संस्थांमध्ये सर्वांत मोठी असलेल्या कॅबिनेटला किंमत राहिलेली नाही. सर्व कामकाज पंतप्रधान कार्यालयातून होतात. समानता नष्ट झाली असून, सर्व निर्णय पंतप्रधान घेतात. लोकशाहीसाठी हे सर्वांत धोकादायक लक्षण आहे, असे श्री. सिन्हा म्हणाले.  रिझर्व्ह बॅंकेवर चुकीच्या कामासाठी दबाव आणला जात होता. त्यामुळे गव्हर्नरने राजीनामा दिला. सीबीआयमधील हस्तक्षेप देशाने पाहिला. केंद्रीय माहिती आयोगाला नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लोकपाल गुंडाळून ठेवण्यात आला आहे. एकाच्या हुकूमशाहीमुळे कॅबिनेटची सुरक्षा समिती नाममात्र झाली आहे. या समितीमधील गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्र्यांना किंमत राहिलेली नाही. कॅबिनेटचे काम हे संविधानानुसार होत नाही. कॅबिनेट आणि मंत्र्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मंत्री हे समान नसून ते सहायक बनले आहेत. न्यायसंस्थेतही वशिलेबाजी सुरू आहे. संसदेचे कामकाज कमी केले गेले आहे, अशी टीका श्री. सिन्हा यांनी केली.  योगी आदित्यनाथ यांचाही मुखवटा गळून पडला आहे. त्यामुळे भविष्यात शहा भाजपचे अध्यक्ष आणि मोदी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसू शकतात, असेही श्री. सिन्हा यांनी स्पष्ट केले. ‘मंत्र्यांना काहीही माहिती नसते’  "देशाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत मंत्र्यांना काहीही माहिती नसते. नोटबंदी अरुण जेटली यांना न विचारता झाली. ६० हजार कोटींच्या विमान खरेदीची कल्पना मनोहर पर्रिकरांना नव्हती. विदेश दौ-यावर जाताना सुषमा स्वराज यांना टाळले जाते, मेहबूबा सरकारचा पाठिंबा काढताना राजनाथ सिंह यांना विचारले नाही, असे सांगून श्री. सिन्हा म्हणाले, की आता फक्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून अपेक्षा आहे. तेथेही पत्रकार बदलले जातात, अॅंकर काढले जातात, हुजरेगिरी करणा-या पत्रकारांना मुलाखती दिल्या जातात. पंतप्रधान कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत. कारण त्यांना लोक जाब विचारतील, याची भीती वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com