agriculture news in marathi, Yield at half the cost of production | Agrowon

उत्पादन खर्चाच्या निम्म्यावर उत्पन्न
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

माळाकोळी, जि. नांदेड : अनियमीत पावसाचा फटका सलग पाचव्या वर्षीही येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणीनंतर पडलेल्या पावसाचा खंड व परतीच्या माॅन्सूनमुळे झालेले सोयाबीन पिकाचे नुकसान, यामुळे यावर्षीही माळाकोळी परिसरातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे उत्पन्न तीस टक्क्‍यांवर आले आहे. यामध्ये उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न खर्चापेक्षा निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

माळाकोळी, जि. नांदेड : अनियमीत पावसाचा फटका सलग पाचव्या वर्षीही येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणीनंतर पडलेल्या पावसाचा खंड व परतीच्या माॅन्सूनमुळे झालेले सोयाबीन पिकाचे नुकसान, यामुळे यावर्षीही माळाकोळी परिसरातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे उत्पन्न तीस टक्क्‍यांवर आले आहे. यामध्ये उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न खर्चापेक्षा निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

माळाकोळी व परिसरात नव्वद टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे. येथील शेतकरी हा पूर्णत; निसर्गावरच अवलंबून आहे. मागील पाच वर्षांपासून कधी अल्पवृष्टी तर कधी अतिवृष्टी तसेच अनियमित पाऊस यामुळे नापिकी होत आहे. मात्र शेतीतील उत्पादन खर्च दरवर्षी वाढतच जात आहे. खते, बियाणे, औषधे, रोजगार, शेती अवजारे यांचा खर्च वाढतच जात आहे. दरवर्षीच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.

यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर सलग वीस ते बावीस दिवसांचा पावसाचा खंड पडला. यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. तसेच काढणीची वेळी झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी शेतातच फुटणे, काळवंडणे हा प्रकार झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम पिकाच्या आणेवारीवर झाला.

साधारणपणे सोयाबीन, ज्वारी, मूग उडीद या पिकांना नांगरणी ते मळणीपर्यंतचा एकरी पंधरा ते अठरा हजार रुपये खर्च येतो. तर उत्पादन हे एकरी आठ ते दहा क्विंटल अपेक्षीत असते. मात्र यावेळी एकरी उत्पादन सव्वा ते दीड क्विंटल झाले आहे. म्हणजेच पस्तीसशे ते चार हजार रुपये उत्पन्न आणि खर्च पंधरा ते अठरा हजार एवढा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

बालाजी बापुराव तिडके यांच्या शेतात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणेवारी काढली असता ही आणेवारी प्रतिएकर सव्वा क्विंटल निघाली. याशिवाय हारीबाई गिरी, शामसिंह बयास, शिवाजी तिडके, रमेश तिडके, माउली गिते यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची मळणी झाली असून यांचेही सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारी पिकाचे उत्पन्न हे एकरी सव्वा ते दीड क्विंटल निघाले आहे.

यातही परतीच्या माॅन्सूनचा फटका सोयाबीनला बसल्यामुळे खराब झालेल्या सोयाबीनला हजार ते बाराशे रुपयेच भाव मिळतो आहे. परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट आहे. यामुळे पिकांची योग्य आणेवारी काढून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...