नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
बातम्या
पलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले दिवस येणार आहेत, त्यामुळे तरुण पिढीने द्राक्ष शेतीकडे जास्तीत जास्त वळावे आणि यातून स्वतःची उन्नती साध्य करावी, असे प्रतिपादन द्राक्ष तज्ज्ञ जगन्नाथ म्हस्के यांनी व्यक्त केलेे.
ते पलूस येथे पलूस तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत आयोजित द्राक्षपिक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. डी. माळी हे होते. या वेळी संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, प्रमुख उपस्थिती होते.

ते पुढे म्हणाले, हा भाग उष्ण पट्ट्यात येत असल्याने येथे द्राक्षाची गुणवत्ता चांगली येते, बरेच तरुण या शेतीकडे वळून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, त्याचे उपयोग करून घेऊन, उत्पादन खर्च कमी करून स्वतःचे उत्पन्न वाढवत आहेत. तरीही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या शेतीकडे पाहिले पाहिजे.
या वेळी दर्जेदार द्राक्ष उत्पादन या विषयावर बोलताना दिलीप माने यांनी रसायन अंशमुक्त द्राक्ष उत्पादन काळाची गरज आहे, द्राक्ष पिकावरील किडीचे व्यवस्थापन एकात्मक पद्धतीने करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद लाड म्हणाले, हा संघ अल्पावधीत शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. येथे रासायनिक खतांच्या बरोबर किडनाशकांचा रास्त किंमतीमध्ये पुरवठा केला जात आहे, याचा शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सरपंच प्रमिला पुजारी, क्रांती कारखान्याचे सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक आणि परिसरातून बहुसंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
- 1 of 565
- ››