agriculture news in marathi, youth tries suicide in front of Mantralaya | Agrowon

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई : अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. ७) मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या तरुणाला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई : अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. ७) मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या तरुणाला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अविनाश शेटे हा तरुण नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने कृषी सेवक पदाची परीक्षा दिली होती. यापूर्वी तो कृषी आयुक्तालय, पुणे येथे तसेच मंत्रालयातील कृषी विभागात पाठपुरावा करीत होता. बुधवारी तो पुन्हा मंत्रालयात आला होता. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने, तसेच कृषी विभागात नोकरीचे पुढे काही होत नसल्याचे पाहून हताश झालेल्या शेटे याने मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंतर त्याची मंत्रालयातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून देण्यात आली. 
पंधरा दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आठ दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. तर गेल्याच आठवड्यामध्ये आणखी एका तरुणाला कीटकनाशकासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शेतकऱ्यांनंतर सुशिक्षित बेरोजगार तरुणही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देऊन पायऊतार व्हावे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

इतर बातम्या
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...