सव्वानऊ कोटी रुपयांचा ‘युवराज’ !!! (व्हीडिअो सुद्धा)

सव्वानऊ कोटी रुपयांचा ‘युवराज’ !!!
सव्वानऊ कोटी रुपयांचा ‘युवराज’ !!!

कोल्हापूर : रेड्याची किंमत तब्बल सव्वानऊ कोटी?... आश्‍चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. हरियानातील सोनारिया गावातील ‘युवराज’ रेड्याला चक्क सव्वानऊ कोटी रुपयांची किंमत आली आहे. पण पुत्राप्रमाणे जोपासना करणाऱ्या हरियानातील कर्मवीरसिंग यांनी ही ऑफर चुटकीसरशी धुडकावत आपल्या युवराजच्या प्रेमाला प्राधान्य दिले आणि हेच प्रेम देशभरातच्या शेतकऱ्यांची उत्सुकता बनून राहिले आहे. या मुऱ्हा जातीच्या रेड्याने लाखाहून अधिक मुऱ्हा जातीच्या म्हशींची पैदास केलेली आहे. नुकत्याच एका प्रदर्शनासाठी हा जातिवंत रेडा कोल्हापुरात आला होता.  १५०० किलोचे अजस्र वजन हरियानातील सोनारिया येथे कर्मवीर डेअरी फार्म आहे. यामध्ये सहा वर्षांचा युवराज दिमाखात उभा असतो. युवराजच्या वीर्यापासून जातिवंत मुरा म्हशींची पैदास होत असल्याने त्याला खूप मागणी आहे. त्याचे वजन तब्बल १५०० किलो आहे. उंची ५ फूट ९ इंच असून, लांबी शेपटीसह १५ फुटांची आहे. तब्बल २२ वेळा ऑल इंडिया चॅंपियन ठरलेल्या युवराजला त्यामुळेच ऑस्ट्रेलियातील काही मंडळींनी तब्बल नऊ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावून खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. युवराजची आई हरियानातील उच्चांकी दूध देणारी म्हैस युवराजची आई गंगा ही हरियानात प्रसिद्ध आहे. तिचे दररोजचे दूध २६ किलो इतके उच्चांकी आहे. गंगाने आतापर्यंत १९ पिलांना जन्म दिला आहे. यौपकीच युवराज हा रेडा देशभरात आपल्या देखणेपणाने नाव कमवत आहे. मुरा जातीच्या पैदाशीत युवराजच्य वीर्याला देशभरातून मोठी मागणी आहे. असा आहे दिनक्रम युवराजला दररोजचा पाच किलोमीटर फेरफटका मारावा लागतो. सकाळी दहा लिटर दूध पाजले जाते. अकरा वाजता पाच किलो सफरचंद घातले जातात. सायंकाळी सहा किलो सफरचंदाचा खुराक दिला जातो. याशिवाय सहा किलो गाजरेही दिली जातात. दुधामध्ये १०० ग्रॅम काजू, बदाम, दुधात उकळून दिले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे अडीच किलो धान्य त्याला लागते. याशिवाय दहा किलो हिरवा चारा दिला जातो. आठवड्यातून दोन वेळा वीर्याचे संकलन युवराजकडून नैसर्गिक रेतन केले जात नाही. आठवड्यातून दोन वेळा त्याचे वीर्य काढून ते कांड्यात भरले जाते. आठवड्याला सहाशे ते सातशे कांड्या वीर्याची साठवणूक केली जाते. एक कांडी ३०० रुपये याप्रमाणे विकली जाते. म्हणे एका आठवड्यात वीस ते एकवीस हजार रुपयांचे उत्पन्न युवराजकडून मिळते.  जातिवंत पैदास हेच ध्येय मुरा जाती या हरियानात विशेष प्रसिद्ध आहेत. याच जातिवंत कुळातील युवराज हा रेडा. तो सहा वर्षांचा आहे. चार वर्षांपासून वीर्यनिर्मितीस सुरवात झाल्यापासून देशभरातील दाेन लाखांपेक्षा अधिक म्हशींना ते भरविण्यात आले आहे. यामुळे त्या म्हशींची दुधाची मात्रा पंचवीस टक्‍क्यांपर्यंत वाढल्याचे त्याची व्यवस्था पाहणारे सुंदरसिंग यांनी सांगितले. आमच्या गोठ्यात अनेक लोक येतात. कराडो रुपये देऊन ते जनावरे खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतात. आम्ही ती विकत नसल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणामध्ये आस्ट्रेलियातील एक शिष्टमंडळ आले होते. त्यांनी सव्वानऊ कोटी देण्याची तयारी दाखविली; पण आम्ही युवराजला देण्यास नकार दिल्यचे सुंदरसिंग सांगतात. त्याच्या वीर्यापासून तयार झालेल्या म्हशींना लाखो रुपयांचा दर मिळत असल्याने ही जात जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवण्याचे आमचे ध्येय असल्याचे सुंदरसिंग यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com