agriculture news in marathi, Zero pendency and daily Disposal will be implemented form April 2018 | Agrowon

राज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या शासकीय कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीस एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांंना प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी आपले जीवन द्यावे लागले, या प्रकरणाचा धसका घेतलेल्या राज्य सरकारने अखेर नवी कार्यपद्धती अवलंबिण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. लोखो नागरिकांना या नव्या कार्यपद्धतीने दिलासा मिळेल आणि हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी अाशा व्यक्त केली जात आहे. 

मुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या शासकीय कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीस एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांंना प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी आपले जीवन द्यावे लागले, या प्रकरणाचा धसका घेतलेल्या राज्य सरकारने अखेर नवी कार्यपद्धती अवलंबिण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. लोखो नागरिकांना या नव्या कार्यपद्धतीने दिलासा मिळेल आणि हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी अाशा व्यक्त केली जात आहे. 

राज्यात “झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल” कार्यपद्धतीचा शासन आदेश राज्य सरकारने गुरुवारी (ता. १५) जारी केला आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यपद्धतीचा स्तर ठरवून देण्यात आला आहे. मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीवर झिरो पेंडन्सी संदर्भात कार्यपद्धती आखून देण्यात आली आहे. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील आत्महत्यांच्या घटनेमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने सामान्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असा शासन निर्णय जारी करून अधिकार्यांना आदेश दिले आहेत.

प्रत्येक कार्यालयाकडे प्राप्त प्रकरणांवर संस्करण करून ऑनलाइन वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयांना देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याखरीज विलंबास प्रलंबित अधिनियम, २००५मध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसार, प्रकरणे आणि संदर्भ निकाली काढणे बंधनकारक राहणार असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्यानंतर्गत ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, त्या सेवांना संबंधित अधिसूचनेनुसार नमूद कालावधी जसाच्या तसा लागू असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.  

भेटीकरिता वेळ राखीव...
मंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज २.३० ते ३.३० ची वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. उपविभागीय आणि त्यावरील अधिकाऱ्यांना सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ लोकांना भेटीसाठी राखून ठेवावा, भेटीच्या वेळा बाहेर बोर्डावर लावाव्यात, असे बजाविण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

शासकीय आदेश
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Mara...

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...