नागरिकांच्या अनामिक भीतीवर झिरो पेंडन्सी हे उत्तर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : शासकीय कार्यालयांबाबत सामान्य जनतेच्या मनात असलेली अनामिक भीती झिरो पेंडन्सीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. झिरो पेडन्सीमुळेच नागरिकांचे काम जलदगतीने होणार असल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गर्व्हनन्स व्याख्यानमालेत बोलताना केले.   अमृतवेल फाउंडेशन व अमृतवेल मीडिया ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी, अमृतवेलचे धमेंद्र पवार आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त दळवी म्हणाले, "शासकीय कार्यालयात येणारा नागरिक काम होण्याच्या आशेने आलेला असतो, त्याच्या अर्जावर जलद व तातडीने काम होण्यासाठी सामान्य माणसाच्या मानसिकतेत जाऊन काम करण्याची गरज आहे. हे काम होण्यासाठी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल कार्यालयात प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.

कार्यालयातील प्रत्येक पेंडन्सी स्वत:ची समजून कार्यालय प्रमुखाने काम करावे, यातून आपण लोकांना योग्य न्याय देऊ, झिरो पेंडन्सी राबविताना प्रथम कार्यालयातील प्रत्येक कागदाची प्रकरणांची निकषानुसार सहा गठ्ठे पद्धतीने ( Six Bundle) पद्धतीने विगतवारी लावणे आवश्‍यक आहे.

यामध्ये प्रलंबित प्रकरणे, प्रतीक्षाधीन प्रकरणे, अहवाल पाठविणे, शासन आदेश परिपत्रके, अभिलेख कक्षाकडे पाठवावयाची कागदपत्रे आणि डिस्पोजल अशा पद्धतीने विगतवारी करावी. अशा पध्दतीने शासकीय कार्यालयात काम झाल्यास सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल व काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला काम केल्याचा आत्मीय आनंदही उपभोगता येईल.'''' प्रारंभी धमेंद्र पवार यांनी स्वागत केले व ई गर्व्हनन्स व्याख्यानमाला आयोजनाबाबतचा उद्देश सांगितला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com