agriculture news in marathi, Zilla Parishad budget estimates should decrese | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात घटीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा ते सात कोटी रुपयांनी घटण्याचे अंदाज असून, यासंदर्भात प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व विभागप्रमुखांकडून जमा खर्चाचा तपशील मागविला असून, पंचायत समित्यांच्या स्वउत्पन्नाची माहितीदेखील लवकर सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिल्याची माहिती आहे.

जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा ते सात कोटी रुपयांनी घटण्याचे अंदाज असून, यासंदर्भात प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व विभागप्रमुखांकडून जमा खर्चाचा तपशील मागविला असून, पंचायत समित्यांच्या स्वउत्पन्नाची माहितीदेखील लवकर सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेला येत्या २७ मार्चपूर्वी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पास मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने धावपळ सुरू झाली आहे. जमा खर्चाचा तपशील त्यासाठी अत्यावश्‍यक असून, हा तपशील प्राप्त झाल्यावर २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्पही मंजुरीसंबंधी कार्यवाही पूर्ण करता येईल.

अर्थसंकल्पातील तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी तर तीन टक्के समाज कल्याण उपक्रमासाठी राखीव केला जाणार आहे. तर दीड टक्के निधी कृषी योजनांसाठी दिला जाईल.

यंदाही सुमारे दीड कोटी रुपये व्यक्तीगत लाभाच्या कृषी योजनांसाठी मंजूर केले जाणार असल्याची माहिती आहे. तर सुमारे एक लाख रुपये ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंसाठी, पाच लाख रुपये हुतात्मा होणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी राखीव करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येणाऱ्या वित्तीय वर्षापासून (१ एप्रिल) पीएफएमएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा खर्च फेब्रुवारीपर्यंत जेवढा असेल तेवढा लक्षात घेऊन सुधारित अंदाजपत्रक तयार होईल. तसेच २०१६-१७ मधील अखर्चित निधी पुढील वित्तीय वर्षात खर्च करण्याची संधी नसणार आहे.

यामुळे जो निधी शिल्लक राहील तो पुढील वित्तीय वर्षात खर्च करण्याची मंजुरी घ्यावी लागेल. ही मंजुरी मिळाल्यानंतर हा निधी कोषागार विभाग खर्च करण्याची परवानगी देईल. निकषानुसार यातील काही निधी कर म्हणून परत जाईल. तसेच अनेक बाबींवरील परतावा मिळणार नाही. यामुळे अर्थसंकल्पात घट येईल, असे सांगण्यात आले.

कृषी योजनांवर दोन कोटी निधी हवा आहे. तर केळीवरील करपा निर्मुलनासाठीही तरतूद व्हावी, यासाठी कार्यवाही करण्यावर कटाक्ष आहे. २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होईल.
- नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगाव

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...