agriculture news in marathi, Zilla Parishad farmers help to control miscreants | Agrowon

हुमणी नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेची शेतकऱ्यांना मदत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सोलापूर : जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांतील उसाला ‘हुमणी'' या रोगाने ग्रासले आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.

सोलापूर : जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांतील उसाला ‘हुमणी'' या रोगाने ग्रासले आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा या तालुक्‍यांतील जवळपास २९ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पीक ‘हुमणी'ने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या रोगाच्या औषधासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सेस फंडातील १० लाख रुपये या आठ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना देण्यात येतील. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील १० टक्के रक्कम टाकून या रोगासाठी औषधांची खरेदी करायची आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीतून सुटका होण्यासाठी या मदतीचा थोडासा हातभार लागणार आहे. बैठकीसाठी गणेश पाटील, रेखा राऊत, संगीता मोटे, दादासाहेब बाबर, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. बेंदगुडे उपस्थित होते.

इतर बातम्या
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवा :...परभणी : टंचाई निवारणासाठी कृती आराखड्यातील...
द्राक्ष उत्पादकांना तज्ज्ञांचे बांधावर...नाशिक : द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा :...जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी...
दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा :...नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे...
सांगली : तेरा छावण्यांत पाच हजारांवर...सांगली : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...