agriculture news in marathi, zilla parishad will be out of DBT scheme | Agrowon

‘डीबीटी’ धोरणातून जिल्हा परिषदा वगळल्या
मनोज कापडे
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

पुणे ः राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदानवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी डीबीटी लागू करण्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदांमधील सेस फंडातील खरेदी ‘डीबीटीमुक्त’ ठेवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   

पुणे ः राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदानवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी डीबीटी लागू करण्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदांमधील सेस फंडातील खरेदी ‘डीबीटीमुक्त’ ठेवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   

जिल्हा परिषदांच्या कृषी विभागांकडून यंदा ३० मार्चला शेतकऱ्यांच्या नावाखाली रातोरात कोट्यवधी रुपयांची औजार खरेदी झाली होती. या खरेदीला मंत्रालयातून मान्यता होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे धाडस पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या राज्य शासनाने का दाखविले नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. डीबीटीमुळे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा होते. तर बिगर डीबीटीमुळे गैरव्यवहाराला चालना मिळते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
  
राज्याच्या कृषी विभागातील एक कंपू व महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) एक लॉबी शेतकऱ्यांच्या नावाखाली औजार खरेदीमध्ये धुमाकूळ घालत होती. अॅग्रोवनने या गैरव्यवहारावर वृत्तमालिका केली होती. त्यामुळे घोटाळेबहाद्दरांना वठणीवर आणण्यासाठी औजार खरेदीला थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरण लागू करण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला. मात्र, आता त्यात जिल्हा परिषदांना वगळल्याचे उघड झाले आहे.   

''डीबीटीमुळे राज्याचा कृषी विभाग व जिल्हा परिषदामधील कृषी विभागाच्या अवजार खरेदीतील गैरव्यवहाराला आळा बसण्याची शक्यता तयार झाली होती. मात्र, डीबीटी धोरणातून जिल्हा परिषदांना सूट देण्यात आल्याचे आता एका पत्रातून उघड झाले आहे. सेस फंडातून होणाऱ्या खरेदीला डीबीटी लागू नसल्याचे पत्र (क्र2017-18-डीबीटी-गुनि-5-2017) जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

जिल्हा परिषदांच्या सेस फंडांमधून राज्यभरात होणारी कोट्यवधी रुपयांची अवजार खरेदी वादात आहे. संशयास्पद व्यवहार होत असतानाही सेस फंडाला ''डीबीटी''तून वगळण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. यामुळे कंत्राटदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मलिदा लाटणारी लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामविकास विभागाच्या म्हणण्यानुसार, सेस फंडाला डीबीटी लागू नसल्याचे पत्र ग्रामविकास खात्याने परस्पर कोणत्याही जिल्हा परिषदेला पाठविलेले नाही. कृषी आयुक्तालयानेच यात पुढाकार घेत यवतमाळ जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवून "डीबीटी धोरण जिल्हा परिषदांच्या सेस फंडाला लागू नाही", असा निर्वाळा दिला आहे. याच पत्राचा आधार घेत इतर जिल्हा परिषदांना देखील तुमच्या सेस फंडातील अवजार खरेदी डीबीटीमुक्त असल्याचा पत्रव्यवहार खुद्द कृषी खात्यानेच केला आहे.  

"मुळात जिल्हा परिषदांचे औजार खरेदीचे कोणतेही स्वतंत्र नियम नाहीत. राज्याच्या कृषी विभागाकडून औजार खरेदीसाठी तयार होणारे दर आणि नियम वापरूनच जिल्हा परिषदांकडून अवजार खरेदी केली जात होती. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागाला डीबीटीची सक्ती आणि जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाला डीबीटीतून सूट, असे परस्परविरोधी धोरण ठेवण्यात शासनाचा हेतू काय आहे," असा सवाल अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

इतर अॅग्रो विशेष
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...