agriculture news in marathi, Zilla Parishad will give grant for purchase of cow,pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेमार्फत गाय खरेदीसाठी ४५ हजारांपर्यंत अनुदान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे  : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेतून शेतकऱ्यांना गीर, थारपारकर, साहिवाल गाय खरेदीसाठी ७५ टक्के किंवा ४५ हजार रुपये यापेक्षा कमी असलेल्या रकमेचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी १३ जुलैपर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी केले आहे.  

पुणे  : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजनेतून शेतकऱ्यांना गीर, थारपारकर, साहिवाल गाय खरेदीसाठी ७५ टक्के किंवा ४५ हजार रुपये यापेक्षा कमी असलेल्या रकमेचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी १३ जुलैपर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी केले आहे.  

नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून गाय खरेदीकरिता अनुदान, ठिबक सिंचन संचासाठी प्रोत्साहन अनुदान, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरा, गांडूळखत निर्मिती संयत्र, जैविक खते, कीटकनाशके, बायोडानॅमिक खत युनिटसाठी प्रोत्साहन अनुदान, हिरवळीचे खते आदी    आवश्‍यक बाबींसाठी अनुदानाचा लाभ देण्यात येईल.

योजनेत गायीसह अन्य सर्व घटकांचा लाभ घेतल्यास जास्तीत जास्त ७० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. ही खरेदी कॅशलेस पद्धतीने करणे बंधनकारक आहे. योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषदेच्या www.punezp.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अर्ज भरून पंचायत समिती कार्यालयात सादर करायचे आहेत, अधिक  माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेसाठी अावश्यक कागदपत्रे व निकष

  • सातबारा उतारा, ८ अ दाखला, आधार कार्ड यांची साक्षांकित प्रत.
  • आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत.
  • लाभार्थ्याकडे किमान तीन एकर आणि कुटुंबाची जास्तीत जास्त १० एकर जमीन असावी.
  • शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी, व त्याची ७/१२ उताऱ्यावर नोंद असावी.
  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...