agriculture news in marathi, Zilla Parishad`s Service Providers of for Farmers | Agrowon

सातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा पुरवठादार'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजूरी, कीड - रोगांचा प्रादुर्भाव, कीटकनाशके या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी विषयक कामे माफक दराने करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना अर्थसाह्य देण्याची योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार आहे.

सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजूरी, कीड - रोगांचा प्रादुर्भाव, कीटकनाशके या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी विषयक कामे माफक दराने करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना अर्थसाह्य देण्याची योजना जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार आहे.

शेतीमधील भांडवल व मिळणारे उत्पादन यांची गणित जुळत नसल्याने शेती किफायतशीर होत नाही, असे दिसून येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना भांडवलाअभावी कृषी अवजारे, ट्रॅक्‍टर, प्रक्रिया यंत्रांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मजुरीचा दरही वेळप्रसंगी जादा द्यावा लागतो. शेतीमधील मजुरांच्या व सेवा सुविधांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी, कमी भाडेदरात साधने मिळण्यासाठी कृषी सभापती मनोज पवार यांच्या संकल्पनेतून सेवा पुरवठादार नेमण्याची योजना जिल्हा परिषद राबवित आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात सेवा पुरवठादार नेमले जाणार असून, त्यात दहा प्रगतिशील शेतकऱ्यांचा गट तयार केला जाणार आहे. त्यांच्यासाठी सेस फंडातून १ कोटी ९४ लाखांची तरतूद केली आहे.

योजनेत सेवा पुरवठादारांवर जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या असून, त्याने वर्षभरात किमान १०० हेक्‍टर क्षेत्रावर कृषी विषयक सेवा देणे तसेच प्रचलित भाडेदरापेक्षा किमान २५ टक्‍के कमी दराने भाडेपट्टी आकारून सेवा देणे बंधनकारक आहे. फवारणीची कामे प्रशिक्षित व पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यक्‍तीच्या मार्गदर्शनाखाली करावी लागणार आहे. या गटास लागणाऱ्या कृषी अवजारांसाठी तीन लाखांपर्यंत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना पुरविलेल्या सेवा-सुविधांची माहिती रेकॉर्ड केली जाणार असून, त्याची तपासणीही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे सेवा पुरविली जात आहे की नाही, याची पंचायत समिती व विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

या योजनेचा उद्देश...

  • शेतकऱ्यांना प्रचलित भाडेदरापेक्षा कमी दराने शेती विषयक सेवा उपलब्ध करून देणे.
  • पिकाच्या पेरणीपासून काढणीपश्‍चात प्राथमिक प्रक्रियेपर्यंत यांत्रिकीकरणाची भाडेतत्त्वावर सेवा पुरविणे.
  • बेरोजगार कृषी पदवीधारकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  • सेवा पुरवठादारास विविध अवजारांचे भांडवली खर्चासाठी अर्थसाह्य करणे.
  • शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करणे.
  • पीक संरक्षण, फवारणी सारख्या कामातून शेतकऱ्यांची जोखीम कमी करणे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...