agriculture news in marathi, zp will doing works of job guarantee scheme, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची कामे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पीय वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पीय वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ७० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी नुकताच या कामांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी प्रत्येक तालुक्‍यात किमान पाच नाला खोलीकरणाची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील १५ दिवसांत ती कामे सुरू करण्यास त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ९१६ अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींना मंजुरी दिली आहे. कोणत्याही स्थितीत या आठवड्यात ती कामे सुरू करण्यास त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एकतरी काम सुरू असणे आवश्‍यक आहे.

पाणी फाउंडेशनच्या कामांसाठी निवड झालेल्या गावांत नाला खोलीकरणाची कामे हाती घेण्याच्या सूचना डॉ. भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला तालुकास्तरावरील बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागाचे उपअभियंता, विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...