रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटप

रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटप
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटप

परभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ८२५ शेतकऱ्यांना १०६ कोटी ८८ लाख रुपये (३४.१० टक्के) पीककर्जाचे वाटप करण्यात आले. याबाबत जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ३१३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये व्यापारी बॅंकांच्या १७९ कोटी रुपये, खासगी बॅंकांच्या २७ कोटी ५१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ३१ कोटी ८१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ७४ कोटी ५४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

डिसेंबरअखेरपर्यंत व्यापारी बॅंकांनी ७ हजार ५४७ शेतकऱ्यांना ७२ कोटी १३ लाख (४०.१६ टक्के), खासगी बँकांनी ५७३ शेतकऱ्यांना ७ कोटी ७९ रुपये (२८.३२ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २४ कोटी ४६ शेतकऱ्यांना (७६.८७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती ४१७ शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपयांचे (३.३५टक्के) पीककर्ज वाटप केले. कर्जवाटपात महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे. मात्र जिल्हा बॅंक आणि खासगी बॅंकांनी कर्जवाटपामध्ये हात आखडता घेतला आहे. सोळा व्यापारी  बॅंकांचे कर्जवाटप ५० टक्क्यांच्या आत आहे.

खरिपात ३०.०५ टक्के वाटप

खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. प्रत्यक्षात ८३ हजार ३८५ शेतकऱ्यांना ४४० कोटी २७ लाख रुपये (३०.०५ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले. व्यापारी बॅंकांनी २३ हजार ७७७ शेतकऱ्यांना १७८ कोटी ७३ लाख रुपये (१६.९८ टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ३३७ शेतकऱ्यांना २७ कोटी ३५ लाख रुपये (५२.१२ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १९ हजार ९५४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ६२ लाख रुपये (७२.७५टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ३१ हजार ३१७ शेतकऱ्यांना ८८ कोटी ५७ लाख रुपये पीककर्ज वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com