agriculture news in marathi,11 sugar factories started in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील ११ कारखान्यांचा हंगाम सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे : साखर कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला आहे. उर्वरित सहा कारखान्यांचाही गळीत हंगाम एक दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे साखर आयुक्तलयाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : साखर कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला आहे. उर्वरित सहा कारखान्यांचाही गळीत हंगाम एक दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे साखर आयुक्तलयाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्य शासनाने गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी परवान्यांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातील ११ साखर कारखान्यांना ऑनलाइन परवाने दिले आहेत. त्यामुळे या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे; परंतु सहा कारखान्यांच्या अर्जांमध्ये काही किरकोळ त्रुटी असून, पूर्तता केल्यानंतर एक दोन दिवसांत परवाने दिले जाणार आहेत.

त्यानंतर त्यांना गळीत हंगाम सुरू करता येणार आहे. यंदा शिरूर तालुक्यात पराग अॅग्रो या नव्याने कारखाना सुरू होणार आहे, तर दोन कारखाने बंद राहणार असल्याचे चित्र आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत जिल्ह्यातील १७ कारखाने सुरू होणार असून, हे कारखाने पूर्ण क्षमतेने हंगामात चालतील.

सध्या जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ८१ लाख मेट्रिक टन साखर गाळप करण्याचे नियोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते.

गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे एक लाख १३ हजार १४० हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी उसाचे सुमारे ८१ लाख टन गाळप होण्याचे अपेक्षित आहे.

त्यातून ९० लाख मेट्रिक टन साखर तयार होईल. सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी मजूर कारखाना स्थळावर दाखल झाले असून, उसाच्या तोडणीस काही ठिकाणी प्रारंभ झाला आहे.

यंदाच्या गाळप हंगामात
ऊसतोडणासाठी मजुरांएैवजी ऊसतोडणी यंत्राचा वापर होणार आहे. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर वर्दळ वाढली असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...