मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबून

मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबून
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबून

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या दिशेन वाटचाल करते आहे. तूर्त मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील १७ लाख ८ हजार ७६८ लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते आहे. दोन महिन्यांत मराठवाड्यात सहाशेवर टॅंकर वाढले असून टंचाईचा सामना करणाऱ्या लोकांनमध्ये साडेनऊ लाख लोकांची भर पडली आहे. 

आजच्या स्थितीला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या सात जिल्ह्यांतील ८०९ गावे व २९० वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या गाव वाड्यांमधील १७ लाख ८ हजार ७६८ टंचाईचा सामना करणाऱ्या लोकांची तहान भागविण्यासाठी १०७६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. टॅंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरसह टॅंकर व्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करण्यासाठी १२२५ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

२० नोव्हेंबर अखेर मराठवाड्यातील केवळ ३११ गाव १३ वाड्यांनाच पाणीटंचाईच्या झळांचा सामना करावा लागत होता. त्यासाठी ४०५ टॅंकरची सोय करण्यात आली होती. शिवाय टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. दोन महिन्यांत टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या गावांमध्ये ४९८ गावांची तर वाड्यांमध्ये २७७ वाड्यांची भर पडली. ६०१ टॅंकरची भर पडलेल्या मराठवाड्यात ८८९ विहिरींचेही अधिग्रहण वाढविण्यात आले असून दोन महिन्यांत टंचाईला तोंड द्याव्या लागणाऱ्या लोकांमध्ये ९ लाख ५७ हजार २४४ लोकांची भर पडली आहे. 

१२२५ विहिरींचे अधिग्रहण 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांत टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी १२२५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३०३, जालना २०२, परभणी २९, नांदेड ५, बीड ३९९, लातूर ८८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १९९ विहिरींचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय टंचाईचा सामना करावा लागणारी लोकसंख्या 

औरंगाबाद  १० लाख २८ हजार ४१८ 
जालना २ लाख ५७ हजार २३०
नांदेड १४ हजार ८८१ 
बीड ३ लाख ७४ हजार ५६६ 
लातूर १० हजार ४८० 
उस्मानाबाद २३ हजार १९३

जिल्हानिहाय टॅंकरची संख्या 

औरंगाबाद ५९४ 
जालना १७२ 
नांदेड  ०५
बीड  २८९ 
लातूर  ०३ 
उस्मानाबाद  १३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com