'आंबतखोल'च्या पाणीसाठ्यात पाच टक्के घट

'आंबतखोल'च्या पाणीसाठ्यात पाच टक्के घट
'आंबतखोल'च्या पाणीसाठ्यात पाच टक्के घट

चिपळूण : चिपळूण परिसरात उन्हाचा तडाखा वाढत अाहे. पाणीटंचाई अधिक भीषण होत आहे. धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घटला आहे. 

तालुक्‍यात अनेक ठिकाणी धरणांतील पाण्यावर नळपाणी योजना चालवल्या जातात. गेल्यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा होता. या वर्षी तो ३३ टक्के आहे. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच टक्के कमी झाला आहे. मात्र, धरणातील पाण्यावर आधारित नळपाणी योजनांवर कोणतीही संक्रात येणार नसल्याची स्थिती आहे. 

धरणातील पाण्यावर आंबतखोल, कुडप, मांडकी, कोकरे, कापसाळ, कोलेखाजन, कामथे, मिरजोळी, मालघर, गोंधळे, भोम, कापरे, रामपुर, पोसरे, दोणावली, कळवंडे, पाचाड, अडरे, वेहळे, अनारी, खोपड या धरणावरील नळपाणी योजना कार्यरत आहेत.

धरण पाणीसाठा (द.ल.घ मीटर)
आंबतखोल २ हजार ४०५
असुर्डे १.८५ 
फणसवाडी १.४०८ 
मालघर २.०१ 
कळवंडे १.९७
अडरे ३. ४२४ 
खोपड १.८६३
मोरवणे  ३.८४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com