agriculture news in marathi,99 posts of Gramsevaks are empty in the district | Agrowon

नगर जिल्ह्यात ग्रामसेवकांची ९९ पदे रिक्त
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नगर ः ग्रामीणविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसेवकांची जिल्ह्यात ९९ पदे रिक्त आहेत. एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

नगर ः ग्रामीणविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसेवकांची जिल्ह्यात ९९ पदे रिक्त आहेत. एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

जिल्ह्यात एक हजार ३१२ ग्रामपंचायती आहेत. त्यासाठी ९५२ ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत. त्यांतील ८५३ पदे भरली असून, ९९ पदे अद्याप रिक्त आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्यांची २५३ पदे मंजूर असून, त्यांपैकी २३२ पदे भरली आहेत. अद्याप २१ पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची १२० पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे भरावीत, यासाठी जिल्हा परिषदेने वेळोवेळी सरकारकडे प्रस्ताव पाठविले आहेत; परंतु सरकारने त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येत आहेत. या रिक्त पदांमुळे त्यांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे; मात्र योजनांच्या अंमलबजावणीत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांचीच पदे रिक्त असल्याने, अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही. निधी अखर्चित राहिल्याने तो परत जात आहे. सध्या जागा रिक्त असल्याने एकेका ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा प्रभारी कारभार असल्याने कामे खोळंबत आहेत.

विकासकामांवर पुरेसे नियंत्रण राहत नसल्याने त्यांचा दर्जा खालावत असून, गैरव्यवहारास खतपाणी मिळत आहे. सरकारने २०१५ पासून ग्रामसेवक व अन्य पदांची भरती बंद केल्याने अनेक अडचणींचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागताे. जिल्ह्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका, लिपिक, पशुधन पर्यवेक्षक यांची अनेक पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तर फारच बिकट अवस्था आहे. त्यांची पदे तर भरली जात नाहीतच; परंतु सेवेत असलेल्यांचेही वेतन वेळेवर दिले जात नाही. कामगार न्यायालयाने आदेश देऊनही अनेक कर्मचाऱ्यांना अल्प वेतनावर राबवून घेतले जात आहे. न्यायालयाचे आदेश असतानाही रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही.

सरकारने अनेक वर्षांपासून ग्रामसेवकांच्या जागा भरलेल्या नाहीत. त्या भरण्यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रिक्त जागांमुळे ग्रामसेवकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून, योजनांचा लाभ वेळेत लाभार्थींपर्यंत पोचविण्यात अडचणी येत आहेत.
- एकनाथ ढाकणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...