agriculture news in marathi,A big response to the employees' strike in the warhad | Agrowon

कर्मचाऱ्यांच्या संपाला वऱ्हाडात मोठा प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

अकोला : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक अाणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पहिल्याच दिवशी वऱ्हाडात मोठा प्रतिसाद मिळाला. या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. सर्वच शासकीय यंत्रणामधील विविध संघटनांनी संपाला पाठिंबासुद्धा दिला आहे.

अकोला : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक अाणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पहिल्याच दिवशी वऱ्हाडात मोठा प्रतिसाद मिळाला. या विभागातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. सर्वच शासकीय यंत्रणामधील विविध संघटनांनी संपाला पाठिंबासुद्धा दिला आहे.

कामगार व कर्मचारी विराेधी धाेरणांच्या माध्यमातून प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा संघटनांचा अारोप आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी व कामगारांमध्ये असंताेष वाढत अाहे. अापल्या मागण्यांची सरकारला जाणीव करून देण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी, जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व इतर संघटनांनी मंगळवार (ता. ४) पासून गुरुवारपर्यंत (ता. ९) संप पुकारला आहे.

कृषी खात्याचे १८ हजारांवर कर्मचारी सहभागी
राज्यात कार्यरत कृषी खात्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, लिपिक, ट्रेसर असे विविध कर्मचारी मिळून सुमारे १८ हजारांवर कर्मचारी सहभागी झाले अाहेत. सध्या राज्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दर दिवसाला वाढत अाहे. शिवाय इतर पिकांवरील किडींचे निरीक्षण, शेतकऱ्यांना सल्ले देण्याचे काम क्रॉपसॅपमधून कृषी सहायक करीत असतात. अाता सर्व कृषी सहायक संपावर असल्याने तीन दिवस निरीक्षण, सर्वेक्षणाचे काम ठप्प राहणार अाहे. शिवाय दुसरा शनिवार, रविवार असल्याने अाता अाठवडाभरच कामकाजावर परिणाम होणाची शक्यता अाहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • सातव्या वेतन आयोगाचे लाभ द्यावा
  • अंशदायी पेन्शन योजना रद्द करीत जुनी पेन्शन योजना अमलात अाणावी
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे,
  • रिक्त पदे तात्काळ भरावी.
  • राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी
  • १ जानेवारी २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता, तसेच थकबाकी देण्यात यावी
  • सेवानिवृत्तीचे वयोमान ६० वर्षे करावे
  • सरकारी कामकाजातील खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे
  • विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या तत्त्वावर आणण्यात यावे.

इतर बातम्या
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...