agriculture news in marathi,A provision of Rs. 3.75 crore for National Agriculture Development Scheme | Agrowon

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी पावणेतीन कोटींची तरतूद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

परभणी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात शेडनेट हाऊस, हरितगृह, कांदा चाळी उभारणी, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मल्चिंग, यांत्रिकीकरणासाठी २ कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये निधीची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत कामे पूर्ण केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अनुदानासाठी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांनी सांगितले.

परभणी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात शेडनेट हाऊस, हरितगृह, कांदा चाळी उभारणी, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मल्चिंग, यांत्रिकीकरणासाठी २ कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये निधीची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत कामे पूर्ण केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अनुदानासाठी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २७ शेडनेट हाऊस उभारणीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ६१ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद आहे. त्यापैकी १८ शेडनेटहाऊसची कामे सुरू झाली आहेत. १५ हरितगृहाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ७० लाख ६५ हजार रुपये निधीची तरतूद आहे. सध्या १३ हरितगृहाची कामे सुरू झाली आहेत. तसेच १ हजार ७५० टन कांदा साठवण क्षमतेच्या एकूण ७० कांदा चाळी उभारण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ६१ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद आहे. ३.२ हेक्टरवर मल्चिंग चे उद्दिष्ट असून, त्यासाठी ५१ हजार रुपयांची तरतूद आहे.

दरम्यान, ५८ शेततळ्यांच्या अस्तरिकरणासाठी ४० लाख रुपये निधीची तरतूद आहे. त्यापैकी ३१ शेततळ्यांच्या अस्तरिकरणाचे काम सुरू झाले आहे. ५६ ट्रॅक्टर वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २६ लाख २२ हजार रुपये निधीची तरतूद आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध कामांसाठी २ कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये निधीची तरतूद आहे. परंतु आजवर केवळ ८८ हजार रुपये एवढा निधी खर्च झाला आहे.

पूर्वसंमतीनंतर कार्यारंभ आदेश दिलेल्या शेतकऱ्यांनी कामे सुरू केली आहेत. परंतु,, कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अहवाल तसेच मोजमाप पुस्तिका सादर केलेल्या नाहीत.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसोबतच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत सघन पेरू लागवड, फुले लागवड, शेडनेट हाऊस, यांत्रिकीकरण, पॅक हाऊस आदी कामे पूर्ण केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनीदेखील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती सादर करावी. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...