अंबाजोगाई येथे ‘जेल भरो’ आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसह आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासाठी जिल्ह्यात आंदोलने सुरूच आहेत. बुधवारी अंबाजोगाई येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले तर गेवराई येथे दुपारपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला.

अंबाजोगाई येथे दीडशेवर कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत बस स्थानकासमोर जेल भरो आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी २५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.  परळी येथे १८ जुलै पासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन बुधवारी (ता. १) १५ व्या दिवशीही सुरूच होते. ठोस अाश्वासनाशिवाय माघार नाहीच, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. बुधवारी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर बुधवारी परळी दाखल झाले. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाबाबत माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com