पाथर्डी, नेवासा येथे आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

नेवासे/ पाथर्डी, जि. नगर  ः मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रविवारपासून (ता. ५) नेवासा येथे मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच समाजातील लोक सहभागी होत आहेत. पाथर्डीत गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारी (ता. ५) दहाव्या दिवशीही सुरूच होते.

मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, आंदोलनाच्या काळात दाखल केलेले कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास १० लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करावे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी रविवारपासून नेवासे शहरातील खोलेश्‍वर चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाचे अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, मेजर संभाजी माळवदे, दीपक धनगे, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर व मुस्लिम नेते युसूफ बागवान आदीसह सर्वधर्मीय नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक नगरसेवक ॲड. काकासाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारूक आतार, जितेंद्र कुर्हे, अंबादास इरले, ॲड. संजीव शिंदे, बाळासाहेब मारकळी, बाळासाहेब कोकणे, ॲड. सादिक शिलेदार, राजेंद्र उंदरे, पोपट जिरे, जाकीर शेख, अभिजीत मापारी, जितेंद्र महाले, कल्पेश बोरकर, असिफ पठाण, माऊली तोडमल, विशाल सुरडे, महेश कोकणे यांनी आंदोलकांची भेट घेऊन   पाठिंबा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com