मालेगाव येथे रास्ता रोको;जिंतूरला भजन आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

नांदेड  : मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, मागणीसाठी गुरुवारी (ता. २) मालेगाव (जि. नांदेड) येथे वसमत- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिंतूर (जि. परभणी) येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन आंदोलन करण्यात आले.

मानवत (जि. परभणी) येथे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देण्यात आली. मालेगाव येथील रास्ता रोको आंदोलनात मालेगाव, देगाव, डौर, कासारखेडा, धामदरी, उमरी, सावरगाव आदी गावांतील मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. या वेळी मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com