agriculture news in marathi,agitation for maratha reservation, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

सातारा  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (ता. २५) येथे पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास गालबोट लागले. महामार्ग रोको आंदोलन करताना युवक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र, युवकांनी महामार्गाच्या खाली जाऊन दोन्हीकडून दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह चार अधिकारी जखमी झाले.

सातारा  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (ता. २५) येथे पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास गालबोट लागले. महामार्ग रोको आंदोलन करताना युवक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र, युवकांनी महामार्गाच्या खाली जाऊन दोन्हीकडून दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. काही युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह चार अधिकारी जखमी झाले.

जिल्ह्यात सकाळपासूनच बंदचे वातावरण होते. `एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायाने अकरा वाजता गांधी मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. मोर्चात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, नगराध्यक्षा माधवी कदम आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्चाची सांगता झाली. त्यानंतर महामार्ग रोको आंदोलन करताना युवक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र, युवकांनी महामार्गाच्या खाली जाऊन दोन्हीकडून दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या सहा ते सात नळकांड्या फोडल्या. शेवटी युवकांची धरपकड सुरू केल्यानंतर आंदोलक युवक बाजूला झाले. युवकांनी महामार्ग रोखला व टायर जाळले. त्यामुळे पुणे व कोल्हापूर बाजूकडील वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांनी महामार्गावर आंदोलन करणाऱ्या युवकांना खाली जाण्याचे आवाहन केले. पण कोणीही ऐकत नव्हते. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

पण त्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले. काही युवकांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. यामध्ये पोलिस अधीक्षकांसह चार अधिकारी जखमी झाले. या वेळी जमावाने पोलिसांच्या सहा, खासगी दोन, तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी युवकांची धरपकड सुरू केली. त्यामुळे जमाव पांगला. परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यावर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रॅली काढून ठिय्या, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...