आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

सातारा  ः मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. २६) जिल्ह्यातील जावली, फलटण येथे मोर्चा काढण्यात आला. जावली येथे कडकडीत बंद पाळून दांडा मोर्चा काढण्यात आला. फलटण शहरात मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मेढा येथे पाच तरुणांनी तीन मजली इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला होता.   जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री चर्चेला आल्याशिवाय इमारतीवरून खाली उरणार नाही, अशी भूमिका घेऊन मेढ्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सहभागी पाच युवक तेथील तीन मजली इमारतीवर चढले होते. आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला. या वेळी सातारा प्रातांधिकारी स्वाती देशमुख यांनी या घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलक खाली उतरले.

जावळी येथे कार्यकर्त्यांनी दांडा घेऊन मोर्चा काढून काढला. जावली तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. फलटण येथे अत्यंत शांततेत मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील विविध भागांतून मोटार, मोटारसायकलला भगवे झेंडे लावत मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन घोषणा देत उभे राहिले होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महिलांनी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी जाधव यांना दिले. ठिय्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांनी मराठा समाजाची भूमिका विविधांगाने स्पष्ट केली. शहरासह सर्व तालुक्यांत बंद पाळण्यात आला. म्हसवड कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com