आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

कऱ्हाड, जि. सातारा  ः मराठा आरक्षणासाठी आम्ही दोन वर्षांहून अधिक काळ लढतोय, तरीही सरकार आम्हाला न्याय देत नाही. आता आम्ही सर्व महिला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मराठा समाजातील महिलांनी सरकारला दिला.  

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा समाजातील महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी महिलांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली.

दोन वर्षे झाली आम्ही मराठा आरक्षणासाठी लढतोय. आता आम्ही महिलांनीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यातूनही आम्हाला न्याय मिळाला नाही, तर बेमुदत उपोषण सुरू करू. शेतीमालास भाव नाही, आरक्षण नाही त्यामुळे शिकता येत नाही. हे आता सहन होईना झाले आहे. त्यामुळे आरक्षणासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आंदोलन करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा या वेळी महिलांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com