agriculture news in marathi,agitation for maratha reservation, varhad, maharashtra | Agrowon

बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत कडकडीत बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

अकोला : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २४) वऱ्हाडात बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात अाला. अकोला जिल्ह्यांत काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अकोला : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २४) वऱ्हाडात बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात अाला. अकोला जिल्ह्यांत काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा अारक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी वऱ्हाडातील विविध शहरांमध्ये बंदचे अावाहन करण्यात अाले होते. सकाळीच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी रस्त्यांवर उतरले. बंदचा प्रभाव बुलडाणा जिल्ह्यात अधिक होता. शेगाव, बुलडाणा, चिखली, मोताळा, खामगाव, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा यासह इतर शहरांमध्ये बंद पाळण्यात अाला. संग्रामपूर तालुक्यात वरवट बकाल येथे बंद पाळून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात अाल्या. अकोला जिल्हयात बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत कौलखेड जहाँगीर येथील तरुणांनी रस्त्यांवर उतरून रास्ता रोको करीत पोलिसांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिले.

वाशीममध्ये आंदोलन पेटले
आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाशीम जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.वाशीम, मालेगाव, रिसोड शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. रिसोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.

वाशीम येथे पुसद नाका चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात कडकडीत बंद पाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. रिसोड शहरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. मालेगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मोहजा फाट्यावर चक्काजाम आंदोलन झाले. आंदोलनामुळे वाशीम शहरातील अनेक शाळांना सुटी देण्यात आली होती. कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...