agriculture news in marathi,agitation for maratha reservation,marathwada, maharashtra | Agrowon

आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; मराठवाड्यात कडकडीत बंद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा सोमवारी (ता.२३) मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) मराठवाड्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने पूर्णत: बंद होती.

औरंगाबाद  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा सोमवारी (ता.२३) मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) मराठवाड्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने पूर्णत: बंद होती.

कायगाव टोका येथील जलसमाधी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी (ता.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले. औरंगाबाद - नगर रस्त्यावरील कायगाव येथे दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. औरंगाबाद-नगर मार्गावर चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले. येथे झालेल्या हिंसक आंदोलनात अग्निशमन दलाच्या एका गाडीला आग लावण्यात आली. काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे व आमदार सुभाष झांबड यांना संतप्त जनसमुदायाने हुसकावून लावल्याची घटना घडली.  

मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे जुना निजामपुलावरून रास्ता रोको आंदोलनादरम्यान जयेंद्र सोनवणे (वय २८) या तरुणाने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ जगन्नाथ विश्‍वनाथ सोनवणे (वय ५५) यांनी देखील विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांनाही औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

उस्मानाबाद येथे ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद ः जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी सकाळी शहरातून फेरी काढून बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

जालना जिल्ह्यात रास्ता रोको
जालना ः जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. घनसांगवी येथे मंगळवारी (ता.२४) मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी भाषणे सुरू असताना बसस्थानक परिसरात अचानक दगडफेक सुरू झाली. त्यानंतर जमावाने घोषणाबाजी करीत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. यात चार ते पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. महाराष्ट्र बॅंकेच्या बाजूला असलेली अंबड नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी व दोन दुचाकीही पेटून देण्यात आल्या. पोलिस व्हॅनसह रुग्णवाहिका व इतर खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तहसील, पंचायत समिती, शासकीय विश्राम गृह, गट साधन केंद्र यांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी एसआरपीएफ जवानांच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

 

 बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
बीड  : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी बुधवारी (ता. १८) परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. त्यानंतर सुरु झालेले ठिय्या आंदोलन मंगळवारी सातव्या दिवशीही सुरूच होते. परळी येथे युवकांनी दुचाकी फेरी काढली. या वेळी शहरातील बरकत नगर भागात फेरी पुढे गेल्यानंतर मागे राहिलेल्या आकाश चव्हाण व साहेब देशमुख या दोघांना दगडफेक करून जखमी करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी परळीतून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

 

या वेळी दुचाकींचीही तोडफोड करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. परळीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गेवराईत शहर बंद केल्यानंतर तहसील कार्यालय बंद करण्यासाठी कार्यकर्ते गेले. कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर दोघेजण कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चढत उडी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी इतरांनी त्यांना खाली उतरविले. शिरूर कासार येथे तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला.

बंदला मोठा प्रतिसाद
नांदेड : मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी मोठा प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, परभणी येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचे वाहन पेटवून देण्यात आले. बंद, रास्ता रोकोमुळे एसटी बस बंद होत्या. पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...