agriculture news in marathi,agitation for maratha reservation,nagpur, maharashtra | Agrowon

विदर्भात आंदोलनाची धग
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

नागपूर  ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मंगळवारी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग पाहावयास मिळाली. अमरावती येथील बंदचे आवाहन करणाऱ्या आंदेलकांनी अचानक मुख्य चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेली झटपट अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन शांततेत पार पडले.

नागपूर  ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मंगळवारी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग पाहावयास मिळाली. अमरावती येथील बंदचे आवाहन करणाऱ्या आंदेलकांनी अचानक मुख्य चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेली झटपट अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन शांततेत पार पडले.

मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेचे पडसाद मंगळवारी (ता.२४) विदर्भात सर्वदूर उमटले. अमरावती येथे आंदोलकांनी बंदचे आवाहन केले. त्यानंतर राजकमल चौकात हा जमाव जात असताना त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या दिला. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यासोबतच तणावसदृश्‍य स्थिती होती. अमरावतीचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आंदोलन शांततेत पार पडले.

वर्धा, यवतमाळ, नागपूर, वाशीम, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी धरणे दिले. यवतमाळमध्ये देखील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानजीक धरणे आंदोलन करण्यात आले. अकोल्यातही धरणे आंदोलन झाले. कौलखेड जहाँगीर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नागपुरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणप्रश्‍नी सुरू असलेल्या आंदोलनावर लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांना दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेत रोज संध्याकाळी अहवाल पाठविण्याचे देखील सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...