agriculture news in marathi,agitation for maratha reservation,solapur, maharashtra | Agrowon

‘सोलापूर बंद’ला काही भागात हिंसक वळण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018

सोलापूर  ः मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता.३०) पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’मध्ये काही भागात टायर जाळणे, दगडफेकीचे प्रकार घडले. परिणामी, पोलिसांनीही लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली; तसेच शहरातील प्रमुख भागांत कोम्बिंग ऑपेरशन केले. दिवसभर सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण राहिले.
   दरम्यान, ग्रामीण भागातही या बंदचे पडसाद उमटले. अनेक गावांत बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन सुरूच होते.

सोलापूर  ः मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता.३०) पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’मध्ये काही भागात टायर जाळणे, दगडफेकीचे प्रकार घडले. परिणामी, पोलिसांनीही लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली; तसेच शहरातील प्रमुख भागांत कोम्बिंग ऑपेरशन केले. दिवसभर सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण राहिले.
   दरम्यान, ग्रामीण भागातही या बंदचे पडसाद उमटले. अनेक गावांत बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन सुरूच होते.

मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी ‘बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स शंभर टक्के बंद होती. त्याशिवाय शहरातही इतरत्र बंद पाळण्यात येत होता. शाळा, महाविद्यालयांनी स्वतःहून सुटी घोषित केली होती; तसेच काही पेट्रोल पंपही बंद होते; पण सकाळी अकराच्या सुमारास काही कार्यकर्ते शिवाजी चौकातील पुतळ्याकडे घोषणाबाजी करत आले. तिथे घोषणाबाजी आणि सरकारच्या निषेधाने वातावरण चांगलेच तापल्याने नेत्यांसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

परिणामी, काही हुल्लडबाजांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, तसा जमाव पांगला. त्याशिवाय लागलीच या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला. निराळे वस्ती, जुना पूना नाका या परिसरातही पोलिसांनी हुल्लडबाजांना शोधून चोपले. काही वेळातच या भागातील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. त्याशिवाय ग्रामीण भागातही मोहोळला रास्ता रोको, अक्कलकोट शहरात बंदसह चुंगीमध्ये गाव बंद आंदोलन करण्यात आले.

बाजार समितीची १२ कोटींची उलाढाल ठप्प
सोलापूर बाजार समितीतील व्यवहार सोमवारी पूर्णपणे बंद राहिले. अत्यावश्‍यक सेवेत भाजीपाल्यासह कांद्याचे लिलावही होण्याची शक्‍यता होती; पण त्यांची आवकच सोमवारी झालीच नाही, शिवाय व्यापाऱ्यांनीही स्वतःहून बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे भाजीपाला, फुले, भुसार बाजार या सगळ्या विभागांत दिवसभर शुकशुकाट होता. बाजार समितीतील आजची एका दिवसाची जवळपास १२ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...