मराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमासाठी सरकारला मंगळवारपर्यंत मुदत

बीड येथे बैठक
बीड येथे बैठक

बीड  : मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, शासनाची होऊ घातलेली मेगा भरती थांबवावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने शासनाला मंगळवारपर्यंत (ता. ७) मुदत दिली आहे. अन्यथा गुरुवारपासून (ता. ९) राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

परळी येथे १८ जुलैपासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन गुरुवारी (ता. २) सोळाव्या दिवशीही सुरूच होते. गुरुवारी राज्यातील २६ जिल्ह्यांच्या समन्वयकांनी परळीत आंदोलनस्थळी हजेरी लावली. यानंतर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनातील महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घ्यावा तसेच मंत्रिमंडळाच्या ठरावासोबत निर्णय परळी येथील आंदोलनस्थळी आणून दिला तरच परळीतील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येईल, असेही समन्वयकांच्या बैठकीत ठरले.  चोरांबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव येथील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही (गुरुवारी) सुरूच होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com