agriculture news in Marathi,Agri input seller has arrears to agri department, Maharashtra | Agrowon

निविष्ठा विक्रेत्यांची कृषी विभागाकडे लाखोंची उधारी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करता येईल. राज्यात अशाप्रकारे सॅम्पलपोटी देण्यात येणारी रक्‍कम चार वर्षांपासून थकीत असेल, तर नक्‍कीच गंभीर बाब आहे. त्यामागील कारणांची माहिती घेतली जाईल.
- एम. एस. घोलप, संचालक, गुण नियंत्रण, कृषी आयुक्‍तालय, पुणे

नागपूर ः निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी व्यावसायिकांच्या दुकानातील नमुने घेण्याची पद्धत आहे. मात्र सॅम्पल म्हणून घेतलेल्या या निविष्ठांचे चुकारे कृषी विभागाकडून गेल्या चार वर्षांपासून झालेच नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील कृषी व्यावसायिकांना यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

हंगामात कंपन्यांकडून पुरवठा झालेल्या कृषी निविष्ठांचा दर्जा तपासण्याची मोहीम कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून राबविली जाते. त्याकरिता बियाणे, खते व इतर विविध प्रकारच्या निविष्ठांचे सॅम्पल कृषी व्यावसायिकांच्या दुकानांतून घेतले जातात. बीटी बियाण्यांचे पाकीट, सोयाबीन बियाणे व इतर सर्व प्रकारच्या बियाणे व इतर सॅम्पलसाठी नियमानुसार संबंधित व्यावसायिकाला पैसे देण्याची तरतूद आहे. त्याकरिता कृषी व्यावसायिकाने गुण नियंत्रण निरीक्षकाला पावती द्यावी व ही पावती नंतर रीतसर आपल्या कार्यालयाकडे सादर करून गुण नियंत्रण निरीक्षकाने पैसे घेत ते व्यावसायिकाला द्यावेत, अशी पद्धत आहे.

चार वर्षांपूर्वी रोखीने हे सारे व्यवहार होत. या वेळी गुण नियंत्रण निरीक्षकांकडून काहीच रक्‍कम व्यावसायिकांना दिली जात होती, असे आरोप आहेत. त्यामुळे शासनाने ही खाबुगिरी टाळण्यासाठी नंतर धनादेशाद्वारे हे परतावे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धनादेशाने हे परतावे होत होते. धनादेशाने परताव्याचे आदेश झाल्यानंतर केवळ एकच वर्ष पैसे व्यावसायिकांना मिळाल्याचे नागपूर जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षांपासून राज्यात सॅम्पल निविष्ठांचे चुकारेच गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून झाले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान राज्यातील कृषी व्यवसायीकांना सोसावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

न्यायालयातून होते कारवाई
सॅम्पलच्या प्रयोगशाळेतील तपासणीत ते निकृष्ट निघाल्यास संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल केला जातो. त्यात हयगय होत नाही; मग कृषी विभागाने सॅम्पलसाठी घेतलेल्या निविष्ठांचे चुकारेदेखील त्याच न्यायाप्रमाणे करावेत, अशी मागणी कृषी व्यावसायिकांची आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...