पुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्य

पुणे बाजारसमितीत कचरा न उचलल्याने घाणीचे साम्राज्य झाले आहे.
पुणे बाजारसमितीत कचरा न उचलल्याने घाणीचे साम्राज्य झाले आहे.

पुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असे बिरुद मिरविणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचरा गेल्या चार-पाच दिवसांपासून उचलला जात नसल्याचा आराेप अडत्यांनी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने बाजार आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. दुर्गंधी पसरल्याने आराेग्यविषयक प्रश्न निर्माण झाले अाहेत. शहर आणि परिसरात स्वाइन फ्लू, डेंगी आणि मलेरिया या आजारांची साथ सुरू असताना, बाजार आवारातील घाणीच्या साम्राज्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार केली तरी कचरा उचलला जात नसल्याची खंत आडते असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केली.

याबाबत भुजबळ म्हणाले, की गेल्या चार-पाच दिवसांपासून भाजीपाला आवाराबराेबर फळ विभागातील कचरा बाजार समितीकडून उचलला जात नाही. हा कचरा सडला असून, बाजारात दुर्गंधी पसरली आहे. याचा दुष्परिणाम बाजार आवारातील घटकांवर हाेत आहे. कचरा सडल्याने साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाला वारंवार माहिती देऊनसुद्धा कचरा उचलला जात नाही. याबाबत आडते असाेसिएशनच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पुढील रविवारी बाजार आवाराची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत विनंती करणार आहाेत. कचरा तातडीने न उचलल्यास प्रसंगी आंदाेलन करण्यात येईल.

बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असून, संचालक मंडळाला शेकडाे काेटींच्या पुनर्विकास प्रकल्पाची स्वप्ने पडत आहेत. पायाभूत सुविधा देण्यास सक्षम नसलेले संचालक मंडळ बाजार आवाराचा काय पुनर्विकास करणार, असा प्रश्‍न उपस्थित करत, पुनर्विकासाला आमचा विराेध असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com