जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये क्विंटल
चंद्रकांत जाधव
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी (ता. २२) कोथिंबिरीला कमाल ३००० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. कोथिंबिरीचा हा दर या सप्ताहातील सर्वाधिक होता. कोथिंबिरीची चार क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १८०० ते ३०००, तर सरासरी २२०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी (ता. २२) कोथिंबिरीला कमाल ३००० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. कोथिंबिरीचा हा दर या सप्ताहातील सर्वाधिक होता. कोथिंबिरीची चार क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १८०० ते ३०००, तर सरासरी २२०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या गिलके, कारले, गवार, वांगी, पालक, भेंडी या भाज्यांची आवक कमी होती. बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची आवक जळगाव, भुसावळ, जामनेर, सिल्लोड, धरणगाव, एरंडोल, भडगाव परिसरांतून होत असते. लसणाचे दरही बऱ्यापैकी असून, त्याची आवक मध्य प्रदेश, छत्तीसगड भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीमध्ये गिलक्‍याची चार क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये क्विंटल दर मिळाला. मिरचीची ४३ क्विंटल आवक
झाली. मिरचीला ८०० ते १६०० रुपये, तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. लसणाची ७२ क्विंटल आवक झाली. लसणाला २००० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३००० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. वांग्याला ९०० ते २१०० रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता.

टोमॅटोची ३७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी एक हजार रुपये क्विंटल दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली. त्याला १४०० रुपये क्विंटल दर होता. कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. कांद्याला ६०० ते १६०० रुपये तर सरासरी ९५० रुपये क्विंटल असा दर होता. फ्लॉवरची पाच
क्विंटल आवक झाली. त्यास १२०० ते २२०० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर मिळाला.

भेंडीची सहा क्विंटल आवक झाली. भेंडीला १८०० ते ३००० रुपये, तर सरासरी २४०० रुपये क्विंटल असा दर होता. बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ३०० ते ६०० रुपये, तर सरासरी ४०० रुपये क्विंटल दर
मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ४०० ते २८२९...मुंबईत प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये मुंबई ः...
कोल्हापुरात ढोबळी मिरचीचे दर स्थिरावलेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात ढोबळी...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारलेसोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
जळगावात मूग ४००० ते ४२०० रुपये क्विंटलजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद...
नागपुरात हरभरा प्रतिक्विंटल ४६०० ते...नागपूर ः लुचई तांदळाचे दर स्थिर असून, हरभरा व...
जळगावात वांगी प्रतिक्विंटल १२०० ते २३००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात कांदा, गवार, काेबी, वांगी,...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात ढोबळी मिरची, वाटाणा तेजीतकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीत या...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, वांग्याचे...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन वधारण्याची शक्‍यतानागपूर  ः बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची...
जळगावात वांगी प्रतिक्विंटल १२०० ते २३००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ऑक्टोबर हीटमुळे वाढली विक्री, बाजार...पुणेः गेल्या आठवड्यापासून वातावरणातील चढ-उतार आणि...
आवळ्याचा हंगाम सुरु  पुणे : आवळ्याला आयुर्वेदिक...
साताऱ्यात दहा किलो वांगी ४०० ते ४५०... सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...