agriculture news in marathi,Average rainfall of 57.8% in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ५७.८ टक्के पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या पर्जन्यमानाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानात मोठी वाढ झाली आहे. २१ ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील दोन दिवस अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. गुरुवारअखेर (ता.२३) वार्षिक सरासरीच्या ५७.८ टक्के इतका पाऊस पडला आहे.

जळगाव : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या पर्जन्यमानाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानात मोठी वाढ झाली आहे. २१ ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील दोन दिवस अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. गुरुवारअखेर (ता.२३) वार्षिक सरासरीच्या ५७.८ टक्के इतका पाऊस पडला आहे.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलिमीटर इतके आहे. मागील वर्षी २१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ४८.५ टक्के म्हणजेच ३२०.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी ३८३.६ मिलिमीटर म्हणजेच मागील वर्षीपेक्षा ६३ मिलिमीटर इतका पाऊस अधिक पडला आहे.
वार्षिक सरासरीचा विचार केल्यास आजपर्यंत सर्वाधिक ७५.५ टक्के इतका पाऊस एरंडोल तालुक्‍यात पडला असून, सर्वांत कमी म्हणजेच ४५.५ टक्के पाऊस भुसावळ तालुक्‍यात पडला आहे. जिल्ह्यात दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे  मंगळवारी (ता.२१) एका दिवसात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.१८ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम,  तर ९६ लघू प्रकल्प आहेत. त्यांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे.

मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटरमध्ये) आणि वार्षिक सरासरीशी टक्केवारी (कंसात) ः

जळगाव तालुका - ३७८.९ (५५.१ टक्के), जामनेर- ३७०.४, (५१.३), एरंडोल- ४७०.७ (७५.५), धरणगाव - ४६७.६ (७५.००), भुसावळ - ३०४.६ (४५.५), यावल - ३३०.१ (४७.३), रावेर - ३८०.३ (५६.९), मुक्ताईनगर - ३१३.६ (५०.१), बोदवड - ४०८.६ (६१.१), पाचोरा - ४२८.२ (५७.६), चाळीसगाव - ३९१.७ (५९.३), भडगाव - ३६९.४ (५५.१) अंमळनेर - ३०६.८ (५२.७), पारोळा - ४४६.९ (७२.५), चोपडा - ३८६.५ (५५.९)

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...