agriculture news in marathi,balasaheb thorat targets state government, nagar, maharashtra | Agrowon

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यात सरकार अपयशी : बाळासाहेब थोरात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नगर  : पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळ आहे. रोजगार हमी, पाणीपुरवठा, चारा छावण्यांबाबत उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी असतानाही कामे झालेली नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करून अधिकाऱ्यांनी केवळ आनंद लुटला, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 

नगर  : पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळ आहे. रोजगार हमी, पाणीपुरवठा, चारा छावण्यांबाबत उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी असतानाही कामे झालेली नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करून अधिकाऱ्यांनी केवळ आनंद लुटला, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 

नगर येथे सोमवारी (ता.१३) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. थोरात बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव विनायक देशमुख, संपत म्हस्के, राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले, की निमगाव घाणा, दशमीगव्हाण, चिंचोडी पाटील येथील छावण्यांना भेट देऊन पाहणी केली. निमगावातील छावणीत ७० जनावरे नव्याने दाखल होऊनही अद्याप नोंद केली गेलेली नाही. दर आठ दिवसांनी प्रशासनाने नेमलेल्या पथकांद्वारे छापा घातला जातो. आता नव्यानेच टॅगिंग, बारकोड, स्कॅनिंग करण्याचा आदेश काढला आहे. अटी, शर्तीचे गुऱ्हाळ करून छावणीचालकांना जेरीस आणले जात आहे. सरकारचा शेतकऱ्यांवर अविश्‍वास का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

चाऱ्याचे भाव तिप्पट वाढले आहेत. सरकारने अनुदानात वाढ केली पाहिजे. सरकार याबाबत मात्र उदासीन आहे. दुष्काळ उपाययोजनांची सरकारला जाण राहिलेली नाही. दुष्काळी स्थितीतही छावणीचालक उधारी करून छावणी चालवत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चालकांबाबत सहकार्याची भूमिका असणे गरजेचे आहे. चारा छावण्या सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी होत आला. छावणी चालवण्यासाठीचा खर्च मोठा आहे; परंतु अद्याप एक रुपयाही छावणीचालकांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यावरून राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे स्पष्ट दिसते, असे आमदार थोरात म्हणाले. 

देशमुख म्हणाले, की राज्यात बीड, औरंगाबाद, त्यानंतर नगर येथे सर्वांत जास्त टॅंकर सुरू आहेत. राज्य सरकार जलयुक्त शिवार अभियानाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली, असा दावा करते. मग नगर जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर टंचाई का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...