agriculture news in Marathi,Banana rates increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon

उत्पादकांसाठी केळी झाली गोड
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

केळीला स्थानिक बाजारासह मुंबई, ठाणे व नाशिक येथून मागणी आहे. तसेच उत्तरेकडेही रोज निर्यात सुरू आहे. चांगली केळी फारशी मिळत नसल्याचे चित्र असून, पुढे काही दिवस केळी बाजारात तेजी असेल, असे वाटते. 
- सुधाकर चव्हाण, केळी बाजार अभ्यासक

जळगाव ः केळीच्या दरात मागील सात आठ दिवसांमध्ये एक क्विंटलमागे १०२५ रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जेदार केळीचा तुटवडा, कमी तापमानामुळे केळी पक्व होण्यास अधिकचा वेळ लागत असल्याने पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, केळीचे दर वाढले असून, ते टिकून राहण्याचे संकेत बाजारातील सूत्रांनी दिले आहेत.

 केळीच्या दरात वाढ होण्यास मागील शनिवारपासून (ता. ६) सुरवात झाली. शनिवारपर्यंत कांदेबाग केळीला ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात किरकोळ वाढ झाली. सोमवारी (ता. ८) दर ९७५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. ही दरवाढ मध्यंतरीदेखील सुरूच राहिली. आजघडीला १०२५ रुपये प्रतिक्विंटल दर आहे. 

सध्या सावदा (ता. रावेर) येथून जम्मू- काश्‍मीरसह पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेशात केळी पाठविली जात आहे. जळगाव, भडगाव भागातून मुंबई, नाशिकच्या बाजारात केळी पाठविली जात आहे. मुंबई येथील बाजारातूनही केळीची मागणी आहे. जळगावमधून रोज सुमारे अडीच हजार क्विंटल केळी मुंबई, ठाणे, कल्याण व नाशकात जात आहे. तर सावदा येथून उत्तरेकडील राज्यांमध्ये रोज सुमारे पाच हजार क्विंटल केळी बॉक्‍समध्ये पाठविली जात असल्याचे सांगण्यात आले. 

रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पिलबाग व आगाप लागवडीच्या नवतीमधील केळीची कापणी सुरू आहे. तर चोपडा, जळगाव, भडगाव भागांत कांदेबाग केळीची कापणी अंतिम टप्प्यात आहे. जुनारीमधील केळीला फारशी मागणी नसल्याने तिची स्थानिक बाजारातच वेफर्स व इतर कारणांसाठी विक्री सुरू आहे.

यातच किमान तापमान केळी पिकाला मानवणारे नसल्याने कापणीच्या अवस्थेतील किंवा घड निसवलेल्या आगाप नवती बागांमधील घड पक्व होण्यास काहीसा वेळ लागत आहे. परिणामी, दर्जेदार केळी मिळत नसल्याची माहिती मिळाली. बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीचे कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. बऱ्हाणपूरचे काही व्यापारी मुक्ताईनगर, रावेरातून केळीची आगाऊ नोंदणी करून पुरवठा करून घेत असल्याचे चित्र आहे. 

केळी दरांची माहिती (प्रतिक्विंटल/रुपये)

तारीख     दर
८ जानेवारी  ९७५
९ जानेवारी   १०००
१० जानेवारी १०२५
११ जानेवारी १०२५
१२ जानेवारी  १०२५

 
    
   
 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...