agriculture news in marathi,black gram procurment problem in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पाच हजार क्विंटल उडीद पडून
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

जिल्ह्यात पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक उडीद पडून आहे. त्याची खरेदी शासकीय दरात व्हावी. किरकोळ कारणांमुळे माल केंद्रात नाकारला जाऊ नये. जिल्हा प्रशासनाने आमच्या मागणीसंबंधी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

- किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी विज्ञान मंडळ, आसोदे, जि. जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शासकीय कडधान्य खरेदी केंद्र शासनाने पूर्वसूचना देऊन बंद केले. परंतु जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुमारे पाच हजार क्विंटल उडीद पडून आहे. त्याची खरेदी केली जावी, यासंबंधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आहे.
 
मागील आठवड्यातच यासंबंधी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु, त्याबाबत अजूनही सकारात्मक निर्णय झालेला नाही. जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व पाचोरा येथे शासकीय कडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. १३ डिसेंबरअखेर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी मागील आठवड्यातही सुरू होती. एकट्या जळगाव येथील केंद्रात ३५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही झाली. नोंदणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी उडीद आणलेला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनमधील सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात उडीद शिल्लक असल्याची बाब आसोदे (ता. जळगाव) येथील नवनिर्मिती शेतकरी विज्ञान मंडळाने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. केंद्र काही दिवस सुरू करावे, असे साकडे या मंडळाने प्रशासनाला घातले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केंद्र सुरू करण्यासंबंधी हालचाली केल्याची माहिती मिळाली. 
 
शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर कडधान्य खरेदीसंबंधी अडतदारांनी अडवणूक सुरू केली आहे. बाजार समितीमध्ये तर मुगाचे दर ४००० ते ४८०० रुपये क्विंटलपर्यंतच आहेत. उडदाचे दर ३६०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याची माहिती मिळाली. जळगाव बाजार समितीमध्ये माल आणल्यानंतर लगेच लिलाव होत नाहीत. कडधान्य पडून राहते, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...