agriculture news in marathi,black gram procurment status in solapur, maharashtra | Agrowon

कुर्डुवाडीत १३ हजार क्विंटल उडदाची हमीभावाने खरेदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018
सोलापूर : कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उडीद, मका हमीभाव खरेदी केंद्रात आतापर्यंत १३ हजार ११४ क्विंटल उडीद, तर १२ हजार २०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून, यापैकी अनेक शेतकऱ्यांचे उडीद विक्रीचे धनादेश काढण्यात आले आहेत. मात्र मका खरेदीची रक्कम शासनाकडून अद्याप जमा झाली नाही. ती जमा करावी, याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे पत्रव्यवहार सुरू असून, ती रक्कम जमा झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती समितीचे उपसभापती सुहास पाटील-जामगावकर यांनी दिली. 
 
सोलापूर : कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उडीद, मका हमीभाव खरेदी केंद्रात आतापर्यंत १३ हजार ११४ क्विंटल उडीद, तर १२ हजार २०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून, यापैकी अनेक शेतकऱ्यांचे उडीद विक्रीचे धनादेश काढण्यात आले आहेत. मात्र मका खरेदीची रक्कम शासनाकडून अद्याप जमा झाली नाही. ती जमा करावी, याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे पत्रव्यवहार सुरू असून, ती रक्कम जमा झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती समितीचे उपसभापती सुहास पाटील-जामगावकर यांनी दिली. 
 
श्री. पाटील म्हणाले, की उडीद खरेदी केंद्रात २४ ऑक्‍टोबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८ दरम्यान २१२६ शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल ५४०० हमीभावाप्रमाणे १३ हजार ११४ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आले. त्यामध्ये सात कोटी आठ लाख १२ हजार ९०० रुपयांची उलाढाल झाली. त्यापैकी एक हजार १७६ शेतकऱ्यांना तीन कोटी ९० लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. उर्वरित ९५० शेतकऱ्यांचे तीन कोटी ७३ लाख ८३२ रुपये शासनाकडून आल्यानंतर धनादेश काढण्यात येणार आहे. 
 
५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या मका हमीभाव केंद्रात आतापर्यंत प्रतिक्विंटल एक हजार ४२५ रुपये हमीभावाने २६० शेतकऱ्यांची १२ हजार २०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्याची एक कोटी ७३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम अद्याप शासनाकडून मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना रक्कम देता आली नसल्याचे ते म्हणाले.
 
तसेच शासकीय तूर हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असून, दोन हजार १०७ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७५१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, उर्वरित नोंदणी सुरू आहे. शेतमाल तोरण योजनेत एकूण १० शेतकऱ्यांनी २१९ क्विंटल माल तारण ठेवला असून, तीन लाख १० हजार १०० रुपये केवळ सहा टक्के दराने सहा महिन्यांच्या मुदतीवर अदा करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...