agriculture news in marathi,commodity rates in market committee | Agrowon

साताऱ्यात दहा किलो पावटा ४०० ते ५०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) पावटा, गवारी, ढोबळी, कारल्याचे दर तेजीत होते. पावट्याची १० क्विंटल आवक झाली. पावट्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. पावट्याच्या दरात रविवारच्या (ता. २६) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) पावटा, गवारी, ढोबळी, कारल्याचे दर तेजीत होते. पावट्याची १० क्विंटल आवक झाली. पावट्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. पावट्याच्या दरात रविवारच्या (ता. २६) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
बाजारसमितीत गवारीची तीन क्विंटल आवक झाली. गवारीस ३०० ते ४०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. गवारीच्या दरात दहा किलोमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीस ३०० ते ३५० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. कारल्याची चार क्विंटल आवक झाली. कारल्यास ३०० ते ३५० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. ढोबळी मिरची व कारल्याच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली.
 
टोमॅटोची १७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस २५० ते ३०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. वाटाण्याची १६ क्विंटल आवक झाली. वाटाण्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. वांग्याची सात क्विंटल आवक झाली. वांग्यास १०० ते १५० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. भेंडीची दोन क्विंटल आवक झाली. भेंडीस २५० ते ३०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. हिरवी मिरचीची नऊ क्विंटल आवक झाली. दहा किलो हिरव्या मिरचीस १०० ते १६० रुपये असा दर मिळाला.
 
वाल घेवड्याची पाच क्विंटल आवक झाली. वाल घेवड्यास २०० ते २५० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. कोबीस १०० ते १५० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. फ्लॉवरची २७ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ८० ते १०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. 
 
पालेभाज्यांमध्ये मेथीची २००० जुड्या आवक झाली. मेथीस शेकडा ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची १५०० जुड्या आवक झाली असून कोथिंबीरीस शेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...