agriculture news in marathi,commodity rates in market committee, jalgaon , maharashtra | Agrowon

जळगावला गवार ३२०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) गवारीची फक्त दोन क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी कायम यामुळे गवारीला ३२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून गवारीची आवक फारशी नसल्याने दरवाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) गवारीची फक्त दोन क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी कायम यामुळे गवारीला ३२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून गवारीची आवक फारशी नसल्याने दरवाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 
बाजारात बुधवारी पपईची सात क्विंटल आवक झाली. तिला १३०० रुपये क्विंटल दर होता. पेरूची पाच क्विंटल आवक झाली. पेरुला १८०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबाची १७ क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर होता. बोरांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर होता.
 
कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ६०० ते ११०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कारल्याला २८०० रुपये क्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. मिरचीला १२०० ते २२०० रुपये तर सरासरी १६०० रुपये क्विंटल दर होता. पालकची तीन क्विंटल आवक झाली. पालकाला १२०० रुपये क्विंटल दर होता. 
 
टोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथी जुड्यांची १८ क्विंटल आवक झाली. तिला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाटाण्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
कांद्याची आवक सुमारे २५० क्विंटल झाली. कांद्याला सरासरी तीन हजार रुपये क्विंटल दर होता. बटाट्यांची आवक सुमारे २०० क्विंटल झाली. बटाट्याला ३५० ते ६०० रुपये तर सरासरी ४५० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...