agriculture news in marathi,commodity rates in market committee, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव येथे गवार ३२०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017
जळगाव  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक कमीच आहे. महिनाभरापासून आवक कमी असून, बुधवारी (ता.२७) दोन क्विंटल आवक झाली. गवारीला एकच ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
 
गवारची लागवड रब्बीत फारशी नसते. जामनेरातील पहूर, पाळधी, शेंदूर्णी, पाचोरा तालुक्‍यातील उत्राण व गिरणा नदीकाठावरील काही गावांमध्ये गवारीची लागवड केली जाते. कूस असलेल्या गवारीला अधिकची मागणी आहे. तिचे लिलावही लगेच होत आहेत. मागील आठवड्यातही प्रतिदिन आवक फक्त दोनच क्विंटल होती, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 
 
जळगाव  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक कमीच आहे. महिनाभरापासून आवक कमी असून, बुधवारी (ता.२७) दोन क्विंटल आवक झाली. गवारीला एकच ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
 
गवारची लागवड रब्बीत फारशी नसते. जामनेरातील पहूर, पाळधी, शेंदूर्णी, पाचोरा तालुक्‍यातील उत्राण व गिरणा नदीकाठावरील काही गावांमध्ये गवारीची लागवड केली जाते. कूस असलेल्या गवारीला अधिकची मागणी आहे. तिचे लिलावही लगेच होत आहेत. मागील आठवड्यातही प्रतिदिन आवक फक्त दोनच क्विंटल होती, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 
 
बाजार समितीत भरीताच्या वांग्यांची बुधवारी ५१ क्विंटल आवक झाली. त्यास १३०० ते १६०० रुपये क्विंटल दर मिळाला. अद्रकची (आले) ५३ क्विंटल आवक झाली. त्याला ११०० ते २३०० रुपये क्विंटल दर होता. कोथिंबिरीची ११ क्विंटल आवक झाली. तिला ६०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथीची १० क्विंटल आवक झाली. मेथीला ५०० ते ९०० रुपये क्विंटल दर होता. कारल्याची दोन क्विंटल आवक होती. कारल्याला २१०० रुपये क्विंटल दर होता.
 
कोबीची ११ क्विंटल आवक झाली. कोबीला ६०० ते ११०० रुपये क्विंटल दर मिळाला. पालकची चार क्विंटल आवक झाली. पालकाला ११०० रुपये क्विंटल दर होता. मुळ्याची सहा क्विंटल आवक झाली. त्याला १००० रुपये क्विंटल दर होता. गाजरांची १३ क्विंटल आवक झाली. त्याला १७०० ते २५०० रुपये क्विंटल दर होता.
 
हिरवी मिरचीची ९५ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते २१०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. त्याला २१५ ते ४१५ रुपये क्विंटल दर होता. लाल कांद्याची ८५० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला १५०० ते २८५० रुपये क्विंटल दर होता. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर होता. बोरांची २५ क्विंटल आवक झाली. बोराला १२०० रुपये क्विंटल दर होता. वाटाण्याची ६० क्विंटल आवक झाली. त्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर होता.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...