जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये क्विंटल

जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये क्विंटल

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभूळाची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता.२०) जांभळाची १० क्विंटल आवक झाली. जांभुळाला ६००० ते ८५०० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. जांभुळाची आवक जामनेर तालुक्‍यानजीकच्या भागातून तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसरासह चाळीसगाव, पाचोरा भागातून होत आहे. आवक स्थिर असून, जांभळाचे लिलाव सकाळी लवकर उरकले जात आहेत. लागलीच त्याचा उठाव होत असल्याची माहिती मिळाली.

बाजारसमितीत बुधवारी बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. बटाटयास १४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) ३० क्विंटल आवक झाली. आल्यास ३५०० ते ५५०० रुपये तर सरासरी ४००० रुपये क्विंटल असा दर होता. लिंबूची १२ क्विंटल आवक झाली. लिंबास १००० ते १५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. कोबीला २००० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

बाजारसमितीत लाल कांद्याची ६७५ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ४०० ते ११५७ रुपये तर सरासरी ८५० रुपये क्विंटल असा दर होता. कैरीची ३५ क्विंटल आवक झाली. कैरीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते १८०० रुपये तर सरासरी १६०० रुपये क्विंटल असा दर होता. वांग्यांची १६ क्विंटल आवक झाली. वांग्याला ८०० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर मिळाला.

मेथी भाजीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला ३००० रुपये क्विंटल दर होता. पालकची तीन क्विंटल आवक झाली. पालकाला १२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस १००० ते १५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com