| Agrowon

जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभूळाची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता.२०) जांभळाची १० क्विंटल आवक झाली. जांभुळाला ६००० ते ८५०० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. जांभुळाची आवक जामनेर तालुक्‍यानजीकच्या भागातून तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसरासह चाळीसगाव, पाचोरा भागातून होत आहे. आवक स्थिर असून, जांभळाचे लिलाव सकाळी लवकर उरकले जात आहेत. लागलीच त्याचा उठाव होत असल्याची माहिती मिळाली.

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभूळाची आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता.२०) जांभळाची १० क्विंटल आवक झाली. जांभुळाला ६००० ते ८५०० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. जांभुळाची आवक जामनेर तालुक्‍यानजीकच्या भागातून तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसरासह चाळीसगाव, पाचोरा भागातून होत आहे. आवक स्थिर असून, जांभळाचे लिलाव सकाळी लवकर उरकले जात आहेत. लागलीच त्याचा उठाव होत असल्याची माहिती मिळाली.

बाजारसमितीत बुधवारी बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. बटाटयास १४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) ३० क्विंटल आवक झाली. आल्यास ३५०० ते ५५०० रुपये तर सरासरी ४००० रुपये क्विंटल असा दर होता. लिंबूची १२ क्विंटल आवक झाली. लिंबास १००० ते १५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. कोबीला २००० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

बाजारसमितीत लाल कांद्याची ६७५ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ४०० ते ११५७ रुपये तर सरासरी ८५० रुपये क्विंटल असा दर होता. कैरीची ३५ क्विंटल आवक झाली. कैरीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. मिरचीला १५०० ते १८०० रुपये तर सरासरी १६०० रुपये क्विंटल असा दर होता. वांग्यांची १६ क्विंटल आवक झाली. वांग्याला ८०० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर मिळाला.

मेथी भाजीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला ३००० रुपये क्विंटल दर होता. पालकची तीन क्विंटल आवक झाली. पालकाला १२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस १००० ते १५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. 

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
श्रावण सरताच उंचावला बाजार, खपवाढीने...महाराष्ट्रात श्रावण संपल्यानंतर ब्रॉयलर्सच्या...
पुणे बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिरपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सटाणा बाजार समितीत डाळिंबाच्या भावात...सटाणा, जि. नाशिक : सटाणा बाजार समितीत बुधवार (ता...
पुणे बाजार समितीत पावटा, बटाट्याचे दर...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते...कोल्हापुरात प्रतिदहा किलो १०० ते ३०० रुपये...
साताऱ्यात फ्लॅावर प्रतिदहा किलो २०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
शेतीमाल भिजल्याने पुणे बाजारात आवक घटलीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडी १००० ते १४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
कोल्हापुरात हिरवी मिरची प्रतिदहा किलो...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात वाटाणा प्रतिदहा किलो ३०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्याला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत भुईमुगाची आवक वाढलीनागपूर ः येथील कळमणा बाजारात भुईमूग शेंगाची...
नगरला मूग ५५२५ ते ६००३ रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे....
पावसामुळे पुणे बाजार समितीत आवक मंदावलीपुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर सुरू...
औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्‍विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२००...परभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपयेनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला...