agriculture news in marathi,commodity rates in market committee pune, maharashtra | Agrowon

पुण्यात गवार, कोबी, शेवग्याचे दर वधारले
गणेश कोरे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १७) भाजीपाल्याची सुमारे २२० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या दाेन - चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला भिजला. परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली हाेती. पितृपंधरवड्यानिमित्त विविध भाजीपाल्यास मागणी कायम असल्याने गवार, काेबी, शेवगा, गाजर, मटार यांच्या दरात वाढ झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांचे दरदेखील वाढले आहेत.

पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १७) भाजीपाल्याची सुमारे २२० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या दाेन - चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला भिजला. परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली हाेती. पितृपंधरवड्यानिमित्त विविध भाजीपाल्यास मागणी कायम असल्याने गवार, काेबी, शेवगा, गाजर, मटार यांच्या दरात वाढ झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांचे दरदेखील वाढले आहेत.

भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ५ टेंपाे, कर्नाटक आणि गुजरात येथून १५ टेंपाे हिरव्या मिरचीची आणि ३ ट्रक काेबीची, कर्नाटकातून भुईमुगाची सुमारे २ टेंपाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे पाच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १५०० गाेणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेट्स, कोबी आणि फ्लाॅवरची प्रत्येकी सुमारे १५ टेंपाे, सिमला मिरचीची १५ टेंपाे, पारनेर, पुरंदर, वाई, सातारा परिसरांतून मटारची सुमारे ५०० गाेणी, तांबडा भाेपळ्याची १० टेंपाे, भेंडी आणि गवारची प्रत्येकी सुमारे १२ टेंपाे, कांद्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः
कांदा : १४०-१६०, बटाटा : ७०-९०, लसूण : २५०-५००, आले सातारी : १७०-२३०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती - ३००-४००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : १००-२५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : १४०-१६०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : १२०-१६०.

वांगी : २५०-३५०, डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २४०-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : १५०-२००, वालवर : १८०-२२०, बीट : १४०-१६०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२२०, मटार : स्थानिक : ७००-१०००, पावटा : २००-२२०, तांबडा भोपळा : १००-१४०, भुईमूग शेंग - ४००, सुरण : २५०-२६०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे दर (शेकडा)ः
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे एक लाख तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती.
कोथिंबीर :  १०००-२०००, मेथी : ८००-१५००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ८००-१०००, करडई : ५००-७००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : १०००-१२००.

फळ बाजारात लिंबाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबीची सुमारे ७५ टन, संत्र्याची सुमारे १२ टन, सीताफळाची ८ टन, डाळिंबाची सुमारे १०० टन, कलिंगडाची सुमारे २५ टेंपाे, खरबुजाची सुमारे १५ टेंपाे, पपईची सुमारे ३० टेंपाे, चिकूचे सुमारे २ हजार बॉक्स, पेरूची सुमारे ४०० क्रेटची आवक झाली हाेती.

फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : २००-५५०, मोसंबी : (३ डझन) : १४०-२३०, (४ डझन ) : ६०-१३०, संत्रा (३ डझन) १००-२००, (४ डझन) : ४०-१००, सीताफळ : १०-१३०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ३०-८०, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०, कलिंगड ५-१०, खरबूज १०-२०, पपई ५-२०, चिकू : १००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-७००, सफरचंद सिमला (२०-२५ किलाे) १२००- २५००, काश्मीर डेलिशिअस (१५) ८००-१४००.

पितृपंधरवड्यामुळे शुभकार्य होत नसल्याने फुलांना मागणी घटली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी फुले बाजारात आणणे कमी केले असल्याने आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने फुलांचे दर सराससरीच्या जवळपास राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच पावसाने फुले भिजल्याने देखील आवकेत घट झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

फुलांचे भाव (प्रतिकिलो) : झेंडू ५ - ३०, गुलछडी ४०-६०, बिजली २०-४०, कापरी १०-२०, ॲस्टर ८ - १२, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी ५-१०, गुलछडी काडी :५-१०, डच गुलाब (२० नग) २०-५०, लिली बंडल २-४,, जरबेरा ५-१५, कार्नेशियन ३०-५०, शेवंती : ३०-६०.

नवरात्र सुरू होणार असल्याने मासळीच्या मागणीत रविवारी (ता. १७) वाढ झाली. भावांतील तेजी टिकून असून, सध्या मासळी बाजारात आवकही चांगली होत आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळीची चांगली आवक होत आहे. गुजरात किनारपट्टीवरून साडेतीन टन, मुंबई येथून सुमारे ३ टन, पापलेट, सुरमई आदी खोल समुद्रातील मासळींची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे २५० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ४०० किलाे आवक झाली हाेती. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १४ टन आवक झाली हाेती.

मासळीचे भाव (प्रतिकिलो) ः
पापलेट कापरी ः १४००, माेठे ः १०००, मध्यम ः ७००-८००, लहान ः ५५०, भिला ः ४८०, हलवा ः ४००-४८०, सुरमई ः ४००-४८०, रावस लहान ः ४८०-५५०, मोठा ः ६५०, घोळ ः ४८०, करली ः २४०-२८०, करंदी ( सोललेली ) ः २४०, भिंग ः ३२०, पाला : ८००-१२००, वाम ः २८०-३६०, ओले बोंबील ः १००-१६०.

कोळंबी लहान : २४०, मोठी : ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स ः ६५०-७५०, लॉबस्टर ः १४००, मोरी : २४०-२८०, मांदेली : ६०-१२०, राणीमासा : ८०-१८०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४८०.

खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः १६०-२००, नगली ः ३६०-४४०, तांबोशी ः ३६०, पालू ः २८०, लेपा ः १२०-१८०, शेवटे : २८०, बांगडा : १००-२००, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००-१२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : ८०-१००.

नदीची मासळी ः रहू ः १४०-१६०, कतला ः १६०-२००, मरळ ः ३६०, शिवडा : १६०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ६०-१००, खेकडे ः २००, वाम ः ४००.

मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.

चिकन ः चिकन ः १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.
अंडी ः गावरान शेकडा : ६००, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश शेकडा : ३७०, डझन : ५४, प्रतिनग : ४.५०.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर विद्यापीठ उभारणार कृषी पर्यटन...सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज...
नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडीनाशिक : जिल्ह्याला एकीकडे पावसाने हुलकावणी...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची...नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील...
कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः...सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा...
कर्जमाफीच्या याद्या बॅंकेबाहेर लावापरभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापूर बाजार समिती निवडणूकीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
सांगलीतील दुष्काळी भागात दूध संकलन घटलेसांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर...
पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक...
परभणी विभागात महाबीजचे ३० हजार हेक्टरवर...परभणी : महाबीजच्या परभणी विभागांतर्गत येणाऱ्या...
मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम...
तीन जिल्ह्यांत एक लाख २० हजार हेक्टरवर... नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात...रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४...
नगरमधील ७ हजारांवर शेतकरी हरभरा...नगर : हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरू असलेले...
‘जलयुक्त’मुळे भूजल पातळी वाढलीसातारा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान...
`पीककर्ज न दिल्यास राष्ट्रीयीकृत...भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत...
साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावमधील तूर, हरभरा उत्पादकांना चुकारे...जळगाव : जिल्ह्यात सुमारे ६८ हजार क्विंटल तूर आणि...
बीटी कापसाचे यशापयश२००२ ते २००८ या काळात बीटी कापसाचे उत्पादन मोठ्या...
जीएम तंत्रज्ञान आणि झारीतले शुक्राचार्यशेतकऱ्यांना व देशाच्या अर्थव्यवस्थेला वरदान...
एचटीबीटी कापूस उपटून नष्ट करण्याची...देशात अनधिकृत व बेकायदा लागवड करण्यात आलेल्या...