पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये
गणेश कोरे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची सुमारे २२० ट्रक आवक झाली. भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला भिजला. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने बटाटा, आले, गवार, काकडी, काेबी, फ्लाॅवर, शेवगा, घेवडा, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असून, काेथिंबिरीला शेकड्याला अडीच हजार रुपये दर हाेता. 
 
पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २४) भाजीपाल्याची सुमारे २२० ट्रक आवक झाली. भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला भिजला. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने बटाटा, आले, गवार, काकडी, काेबी, फ्लाॅवर, शेवगा, घेवडा, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असून, काेथिंबिरीला शेकड्याला अडीच हजार रुपये दर हाेता. 
 
भाजीपाल्याच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतील कर्नाटक आणि गुजरात येथून सूमारे १५ टेंपाे हिरवी मिरचीची, कर्नाटकमधून २ ट्रक काेबीची, कर्नाटकातून भुईमुगाची सुमारे ३ टेंपाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे पाच हजार गोणी तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली हाेती.
 
स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १४०० गाेणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेट्स, कोबी आणि फ्लाॅवरची प्रत्येकी सुमारे १५ टेंपाे, सिमला मिरचीची १५ टेंपाे, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरातून मटारची सुमारे ४०० गाेणी, तांबडा भाेपळयाची १० टेंपाे, भेंडीची सुमारे १० तर गवारीची सुमारे ६ टेंपाे, पुरंदर तालुक्यातून गाजराची सुमारे एक हजार गाेणी, पावटा आणि घेवड्याची प्रत्येकी सुमारे ५ टेंपाे तर कांद्याची सुमारे १२५ ट्रक आवक झाली.
 
फळभाज्यांचे भाव (प्रति दहाकिलो) ः कांदा : १५०-२००, बटाटा : ८०-१४०, लसूण : २५०-५००, आले सातारी : २००-२६०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती - ३००-५००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी १८०-२२०, पांढरी : १५०-१६०, पापडी : २००-२२०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १५०-२००, वांगी : २००-३००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ६००-७००, गाजर : १००-१६०, वालवर : २५०-२८०, बीट : १४०-१६०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २८०-३२०, मटार : स्थानिक : ७००-१०००, पावटा : २८०-३००, रताळी कर्नाटक १५०-२००, स्थानिक कराड, मलकापूर २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१२०, भुईमूग शेंग - ३५०-४००, सुरण : २८०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे ७५ हजार तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा) ः कोथिंबीर : ८००-२५००, मेथी : १०००-१४००, शेपू : ४००-७००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-६००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ८००-१०००, पालक : १०००-१५००.
 
फळ बाजारात लिंबाची सुमारे ६ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबीची सुमारे ७० टन, संत्राची सुमारे २५ टन, सीताफळाची १५ टन, डाळिंबाची सुमारे १५० टन, कलिंगडाची सुमारे २५ टेंपाे, खरबुजाची सुमारे २० टेंपाे, पपईची सुमारे २५ टेंपाे, चिकूची सुमारे १ हजार बॉक्स, पेरूची सुमारे ५०० क्रेटची आवक झाली हाेती.
 
फळांचे भाव ः लिंबे (प्रति गोणी) : १००-२५०, मोसंबी : (३ डझन) : १३०-२५०, (४ डझन) : ६०-१२०, संत्रा (३ डझन) १००-२५०, (४ डझन) : ५०-१२०, सीताफळ : २०-२५०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ३०-८०, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०, पपई ५-२० चिकू : १००-४०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-७००. 
 
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे झेंडूसह विविध फुले भिजल्याने नुकसान झाले आहे.  नवरात्रामुळे काही फुलांच्या मागणी आणि दरात वाढ झाली आहे. फुलांचे भाव (प्रतिकिलो) : झेंडू ५ - ३०, गुलछडी ७०-१५०, बिजली ५०-१००, कापरी १०-४०, ॲस्टर १० - २०, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी १५-२५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) ५०-८०, लिली बंडल १५-२५, जरबेरा १०-३०, कार्नेशियन ५०-१००, शेवंती : ८०-२००, माेगरा ७००-१३००, जुई ७००-८००. 
 
गेल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे मासेमारीचे प्रमाण घटले हाेते. परिणामी, मासळी बाजारातील आवक घटली असून, नवरात्र सुरू झाल्याने मागणीदेखील घटली आहे. आवक आणि मागणी दाेन्हीही घटल्याने मासळीचे दर स्थिर हाेते. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२४) खोल समुद्रातील मासळींची ६ टन, खाडीची सुमारे १५० किलो, नदीतील मासळीची सुमारे १५० किलाे आवक झाली हाेती. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ८ टन आवक झाली हाेती.
 
मासळीचे भाव (प्रतिकिलो) ः पापलेट कापरी ः १३००-१४००, माेठे ः १०००-११०, मध्यम ः ७००, लहान ः ५००-५५०, भिला ः ३२०-३६०, हलवा ः ३६०-४४०, सुरमई ः ४००, रावस लहान ः ४४०, मोठा ः ५५०, घोळ ः ४८०, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः २८०, भिंग ः २८०, पाला : ७५०-१४००, वाम ः २००-३२०, ओले बोंबील ः ८०-१२०. कोळंबी ः लहान : २००, मोठी :४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४००, मोरी : १४०-२४०, मांदेली : ८०-१००, राणीमासा : १४०-१८०, खेकडे : १६०, चिंबोऱ्या : ४००.
 
खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः १६०-१८०, नगली ः ३२०-४००, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १२०-१६०, शेवटे : २००, बांगडा : १४०-२००, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १४०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००. नदीची मासळी ः रहू ः १४०, कतला ः १८०, मरळ ः ३६०, शिवडा : १४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १४० वाम ः ३६०-४००. 

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...