agriculture news in marathi,commodity rates in market committee pune, maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कांदा वधारला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017
पुणे   ः खरिपातील लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील उशिराने सुरू झालेले उत्पादन आता सुरळीत झाले आहे. परिणामी गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची हंगामातील सर्वाधिक सुमारे २०० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या दाेन आठवड्यांच्या तुलनेत आवक सुमारे ४० ट्रकने वाढली आहे. कांद्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढले हाेते.  
 
पुणे   ः खरिपातील लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील उशिराने सुरू झालेले उत्पादन आता सुरळीत झाले आहे. परिणामी गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची हंगामातील सर्वाधिक सुमारे २०० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या दाेन आठवड्यांच्या तुलनेत आवक सुमारे ४० ट्रकने वाढली आहे. कांद्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढले हाेते.  
 
भाजीपाल्याच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यातील मध्य प्रदेश आणि पंजाबमधून सुमारे १० ट्रक मटारची, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे २० टेम्पाे हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ७ ट्रक काेबीची, राजस्थानमधून गाजराची सुमारे ६ टेम्पाे, आंध्र प्रदेशातून शेवग्याची सुमारे ४ टेम्पाे, बंगळूर येथून चार टेम्पाे आलेची, तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा, इंदाैर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली हाेती.
 
स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेटस, कोबीची १५ तर, फ्लाॅवरची २२ टेम्पाे, सिमला मिरचीची १० टेम्पाे, तांबडा भाेपळयाची १० टेम्पाे, भेंडीची १२ तर गवारीची ८ टेम्पाे, हिरवी मिरचीची ६ टेम्पाे, वांगीची सुमारे ८ टेम्पाे, भुईमूग शेंगांची सुमारे ३० गाेणी, सिमला मिरचीची १० टेम्पाे आवक झाली हाेती. तसेच नवीन कांद्याची सुमारे ३५ तर जुन्या कांद्याची ४० ट्रक आवक झाली हाेती.
 
फळभाज्यांचे दर (दहा किलो) ः 
कांदा : ३००-४००, बटाटा : ६०-८०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : १८०-२२०, बंगलाेर २४०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती - ३००-४००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : २५० - ३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २५०-२८०, पांढरी : १८०- २००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : १६०-२२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-२८०, जाड : १००-१२०, शेवगा : ८००-९००, गाजर :२५०-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : २००-३००, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३५०, मटार : परराज्य : ५५०, पावटा : ३५०-५००, तांबडा भोपळा : ८०-१२०, भुईमुग शेंग ३५०, सुरण : २८०-३२०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांचे दर (शेकडा) ः 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : ४००-७००, मेथी : ५००-७००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-६००, करडई : ५०० - ६००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-८००, चवळी : ८००-१०००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी ८००-१०००.
 
फळ विभागात रविवारी (ता. १९) मोसंबीची सुमारे ८०, संत्रीची ५, डाळिंबाची ७० ते ८० टन, पपईची सुमारे २0 टेम्पोे, लिंबाची सुमारे ८ हजार गोणी, चिक्कूची २ हजार बॉक्स, पेरूची दीड हजार क्रेट, कलिंगडाची १५ टेम्पो, खरबूजाची १५  टेम्पो तर विविध जातींच्या बोरांची तीनशे गाेणी आवक झाली. द्राक्षांची एक टन, स्ट्रॉबेरीची सुमारे ६०० किलो, सीताफळाची ५ टन इतकी आवक झाली हाेती. 
 
फळांचे दर ः 
लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : २००-३००, (४ डझन ) : १२०-१८०, संत्रा : (३ डझन) १४०-२४० (४ डझन) : ८०-१४०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ,३५-११० गणेश ५-१५, आरक्ता १५-३५ कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : २००-४००, सीताफळ : २०-१२५. सफरचंद : सिमला (२५ किलो) : ११००-१५००, काश्मीर डेलिशियस (१५-१६ किलो) ७००-१३००, किन्नोर : (२५ किलो) १४००-२२०, अमेरिकन डेलिशियस : (१५ किलो) १०००-१२००, महाराजा : (१५ किलो) ४००-७००. बोरे : चेकनट (१० किलो) ५००-५७०, चन्यामन्या : २५०-३००, चमेली : १२०-१४०, उमराण : ७०-८०, स्ट्रॉबेरी : (२ किलाे पनेट) २५०-४००, द्राक्षे : तासगणेश : ७००-९००.
 
मार्गशीर्ष महिन्यातील पूजांमुळे विविध फुलांना मागणी वाढली आहे. याच कारणासाठी कोकणातूनदेखील फुलांना मागणी वाढली अाहे. तसेच लग्न हंगाम सुरू झाल्यानेदेखील विविध फुलांना मागणी वाढल्याने दर तुलनेने वाढले आहेत.  
फुलांचे दर (प्रति किलो) ः  झेंडू : १०-४०, गुलछडी : ४०-८०, बिजली : ३०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-६०, ऑस्टर : ८-१६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, ग्लॅडिएटर : १०-२०, गुलछडी काडी : १०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलिबंडल : ५-७, जर्बेरा: २०-४०, कार्नेशियन : १००-१८०, अबोली लड : १५०-२००.
 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १९) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ३०० किलो आणि नदीतील मासळीची सुमारे ६०० किलाे आवक झाली हाेती. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १२ टन आवक झाली हाेती.
भाव (प्रतिकिलो) ः पापलेट कापरी ः १४००, माेठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ६००, भिला ः ३६०, हलवा ः ४८०, सुरमई ः ४००-४८०, रावस लहान ः ४००-४८०, मोठा ः ५५०, घोळ ः ४८०, करली ः २४०, करंदी ( सोललेली ) ः २००, भिंग ः २००, पाला : ४००-१४००, वाम ः पिवळी १६०-३६०, काळी २४०, ओले बोंबील ः १००.
 
कोळंबी ः लहान : २४०, मोठी :४८०, जंबोप्रॉन्स : १४५०, किंगप्रॉन्स ः ८००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ३६०- ४८०.
 
खाडीची मासळी ः सौंदाळे ः २४०, खापी ः १६०, नगली -४००, तांबोशी ः २२०, पालू ः २००, लेपा ः १६०, शेवटे : २४०, बांगडा : १२०-१६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : २४०, तारली : १००.
 
नदीची मासळी ः रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ३६०, शिवडा : १२०, चिलापी : ६०, मांगूर : १२०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १२० वाम ः ४४०.
 
मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.
 
चिकन ः १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.
 
अंडी ः थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाली असून, दरदेखील वाढले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गावरान अंड्याच्या दरात शेकड्याला १२० तर इंग्लिशमध्ये शेकड्याला ६७ रुपयांनी वाढ झाली आहे.
गावरान ः शेकडा : ९००, डझन : १२०, प्रति नग : १०.
इंग्लिश शेकडा : ५८५, डझन : ७८, प्रतिनग : ६.५०.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...