पुण्यात हिरवी मिरची, फ्लॉवरचे दर वधारले

पुणे बाजारसमिती
पुणे बाजारसमिती
पुणे  ः गुलटेकडी येथील बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ते १६० ट्रक आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली आहे. आले, हिरवी मिरची आणि फ्लॉवरच्या दरात वाढ झाली. इतर भाजीपाल्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत.
 
आवकेमध्ये परराज्यांतून जयपूर येथून मटारची सुमारे १५ ट्रक, राजस्थान येथून गाजराची सुमारे १० ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबीची सुमारे ५ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरचीची सुमारे १२ टेंपाे, बंगळूर येथून आल्याची सुमारे ३ टेपाे आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ६ टेपाे आवक झाली हाेती.
 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटाेची सुमारे सहा हजार क्रेट, हिरव्या मिरचीची ४ टेंपो, सिमला मिरचीची १२ टेंपाे, फ्लॉवरची १५ टेंपो, काेबीची १५ टेंपाे, काकडीची ८ ते १० टेंपो, मटारची ३० गाेणी, पावटाची ६ टेंपाे, तांबडा भाेपळ्याची १२ टेंपाे, भेंडीची ८, तर गवारची ३ टेंपाे आवक झाली हाेती. कांद्याची सुमारे ३५० ट्रक, आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ३५ ट्रक आवक झाली हाेती. मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे साडेतीन हजार गाेणी आवक झाली हाेती.
 
फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा : १००-१३०, बटाटा : ८०-१२०, लसूण : १५०-३५० आले : सातारी: २००-२७०, बंगळूर : २७०-३००, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान ४००-५५०, टोमॅटो : ३०-६०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १२०-१४०, कारली : हिरवी ३००, पांढरी : २००-२२०, पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : २०-४०, वांगी : ५०-१००, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०.
 
शेवगा : १००-२००, गाजर : ८०-१२०, वालवर : १२०-१५०, बीट : ३०-८०, घेवडा : २००-३००, कोहळा : २००-३००, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : २००-२५०, मटार : परराज्य : १८०-२००, स्थानिक : २५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे पावणेदाेन लाख, मेथीची सुमारे एक लाख जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा) ः कोथिंबीर : २००-५००, मेथी : २००-५००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी : ५००-७००.
 
फळ बाजारात रविवारी (ता. २५) मोसंबीची सुमारे ३५ टन, संत्रीची ५० टन, डाळिंबाची सुमारे ४० टन, पपईची १२ टेंपोे, लिंबाची सुमारे ७ हजार गोणी, चिकूची २ हजार गाेणी, पेरूची सुमारे २०० क्रेट, कलिंगडाची ३५ टेंपाे, खरबुजाची २५ टेंपाे तसेच विविध द्राक्षांची सुमारे ३० टन आवक झाली हाेती.
 
फळांचे दर ः लिंबे (प्रति गोणी) : ५०-२००, मोसंबी : (३ डझन) : २५०-३००, (४ डझन ) : १५०-१७०, संत्रा : (३ डझन) २००-३००, (४ डझन) : १४०-२००, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ६०-१४०, गणेश १५-४५, आरक्ता २५-६०, कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : प्रति किलाे १०-५०, पेरू (२० किलो) : ४००-१०००, द्राक्षे : तास -ए- गणेश (१५ किलो) ५००-७००, सुपर सोनाका (१५ किलो) : ७००-११००, जम्बो (१० किलो) : ५००-९००, सोनाका (१५ किलो) : ६००-१०००, माणिकचमण (१५) ५००-७००.
 
मटण, मासळी : वाढत्या उन्हामुळे खोल समुद्रातील मासळीची आवक कमी होत आहे . मात्र मागणी चांगली असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत खोल मासळीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. 
 
नदीच्या मासळीला चांगली मागणी असल्याने त्यांच्या दरात देखील १० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली हाेती. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता.२५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची ३ टन, नदीची एक ते दीड टन, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० टन आवक झाली हाेती. 
 
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००, मोठे : १५००, मध्यम : ११००, लहान : ८००, भिला : ६००, हलवा : ६००, सुरमई : ५५०-६००, रावस-लहान : ६००, मोठा : ७००, घोळ : ६००, करली : २८०, करंदी : ३२०, भिंग : २००, पाला : ७००-१२००, वाम : ४४०,  ओले बोंबील : १६०-२००.
 
कोळंबी ः लहान : ३२०, मोठी : ४८०-५५०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी :  सौंदाळे : २००-२४०, खापी : २००-२४०, नगली : २४०-२८०, तांबोशी : ४४०,  पालू : २८०, लेपा : १६०-२००, शेवटे : २४०, बांगडा : लहान : १२०, मोठे : १८०-२००, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१६०,  तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १६०, तारली : १००-१२०.
 
नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १८०, मरळ : ४४०, शिवडा : २२०, चिलापी : ८०, मांगूर : १४०, खवली : १८०, आम्ळी : १२० खेकडे : २००, वाम : ५००.
मटण ः बोकड : ४४०, बोल्हाई : ४४०, खिमा : ४४०, कलेजी : ४८०. चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. अंडी : गावरान : शेकडा : ८२०, डझन : १०८ प्रति नग : ९.००. इंग्लिश : शेकडा : ४२५ डझन : ६० प्रतिनग : ५.
 
फुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : ४-२०, गुलछडी : ७०-१२०, बिजली : २-६, कापरी : ५-२०, माेगरा २००-३००, अॅस्टर : ६-१२, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ५-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिली बंडल : २-३, जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ३०-८०, कागडा बंडल ८०-१२०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com